Home / चंद्रपूर - जिल्हा / पालकमंत्र्यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा

पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून अनुसूचित जमातीतील मुलींसाठी रोजगाराची सुवर्ण संधी

पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून अनुसूचित जमातीतील मुलींसाठी रोजगाराची सुवर्ण संधी

टाटा इलेक्ट्रॉनिक्स देणार प्रशिक्षण व रोजगार

चंद्रपूर, दि.5 जानेवारी : जिल्ह्यातील मुलींच्या सबलीकरणासाठी व त्यांना आर्थिक निर्भर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार प्रयत्नशील असून त्यांच्या पुढाकारातून अनुसूचित जमातीतील मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास व टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सुटे भाग निर्मितीच्या क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षित मुलींना टाटा इलेक्ट्रॉनिक्स मध्येच रोजगार निर्माण करून देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक मुलींची शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, वय 18 ते 20 दरम्यान, वजन कमीत कमी 45 किलो, उंची 145 सेंटिमीटर असावी.

सुरवातीला विद्यार्थिनींना लेखी चाचणी द्यावी लागेल. ज्यामध्ये सामान्यज्ञान, कलाचाचणी आणि काही गणितीय घडामोडीवर लेखी चाचणी आधारलेली असेल. त्यानंतर त्यांना प्रात्यक्षिक परीक्षालासुद्धा सामोरे जावे लागेल. निवड झालेल्या मुलींना टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कडून 24 दिवसांचे विनाशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. सोबतच त्यांना यादरम्यान निवास व भोजनाची मोफत सुविधा देण्यात येणार आहे. 24 दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडलेल्या मुलींना टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड होसुर, तामिळनाडू येथे रोजगार मिळेल.

निवड झालेल्या मुलींना पंधरा हजार रुपये मासिक वेतनासह , जेवण, निवास आणि येणे- जाण्याची सुविधा अत्यंत कमी किमतीत कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. सुरक्षित वातावरणात काम करण्याची संधी  या मुलींना मिळणार आहे. तसेच त्यांच्या कामाच्या प्रगतीवर त्यांना कंपनीमध्ये विविध पदावर पदोन्नती होण्याची संधी आहे. याबाबतची अधिकची माहिती व  अर्ज  करण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...