वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे अलिकडच्या काळात स्थापन झाले असून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. येथे आलेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी अतिशय दक्ष राहून रुग्णसेवा द्यावी. तसेच नियमितपणे सकाळी वेळेवर उपस्थित राहावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व विभाग प्रमुखांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, डॉ. कानगावकर आदी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स आणि विभाग प्रमुख मुख्यालयी निवासी राहत नसेल किंवा वेळेवर उपस्थित नसेल तर रुग्णांना चांगली सेवा मिळणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत, याची जाणीव ठेवा. सर्व विभाग प्रमुखांनी सकाळी 8 वाजता रुग्णालयात हजर राहणे गरजेचे आहे. महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रयोगशाळा एक महिन्याच्या आत सुरु करण्याचे नियोजन करा. तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी थ्री- डी व्हर्चुअल प्रयोगशाळेचा प्रस्ताव त्वरीत पाठवा, अशा सुचना त्यांनी केल्या.
तत्पूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली असता पालकमंत्री म्हणाले, रुग्णांच्या अनेक तक्रारी असल्यामुळे आज आपण प्रत्यक्ष येऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे. येथे औषधांची मागणी मोठी आहे. यापूर्वी हॉफकीन संस्थेकडून औषधी खरेदी केली जायची. त्यामुळे मागणी केल्यावरसुध्दा सहा-सहा महिने वाट पाहावी लागत होती. आता मात्र स्थानिक स्तरावर जिल्हा नियोजन समिती, खनीज विकास निधी आदीतून औषधी खरेदी करता येते. तसेच येथे आवश्यक असलेल्या मनुष्यबळाबाबत तसेच निधीबाबत सचिवांना सुचना दिल्या आहेत. वाढीव निधी औषधी आणि सर्जीकलसाठी उपयोगात आणला जाईल.
औषधांसाठी 8 कोटी 21 लक्ष रुपये पुरवणी मागण्यांमध्ये मागितले असून नवीन खरेदीसाठी अतिरिक्त मागणी केली आहे. येथे अजूनही काही प्रमाणात अडचणी असल्या तरी नवीन अधिष्ठाता रुजू झाल्यापासून 80 टक्के तक्रारी कमी झाल्या आहेत. उर्वरीत 20 टक्के अडचणी त्वरीत सोडविल्या जातील. महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी रोज एक तास सामान्य रुग्णालयाला भेट देऊन औषधींचा साठा किती, पुरवठा किती याबाबत नियमित आढावा घ्यावा, अशा सुचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयात नव्याने लावण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीनचे उद्धाटन केले.
पालकमंत्र्यांनी अतिदक्षता विभाग, औषधी कक्ष, बाह्यरुग्ण विभागाची पाहणी करून रुग्णांसोबत संवाद साधला. वैद्यकीय महाविद्यालयातील आढावा बैठकीला डॉ. गजभिये, डॉ. अविनाश टेकाडे, डॉ. दिलीप कुमरे, डॉ.चव्हाण, डॉ. सुरपाम, डॉ. सारिका ठाकरे, डॉ. टिपले, डॉ. जांभुळकर, डॉ. परांजपे, डॉ. मामिडवार, डॉ. चेतन नागरेचा, डॉ. सोनारकर आदी उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...