Home / महाराष्ट्र / पुणे व इतर जिल्ह्यातील...

महाराष्ट्र

पुणे व इतर जिल्ह्यातील सर्व मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावे द्या - संभाजी ब्रिगेडची मागणी.

पुणे व इतर जिल्ह्यातील सर्व मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावे द्या - संभाजी ब्रिगेडची मागणी.

भारतीय वार्ता (पुणे)- महाराष्ट्टात पुणे हे विद्येचे माहेरघर असून सांस्कृतिक, परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीचा वसा आणि वारसा जपणारे शहर आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी पुणे वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच पुण्यातून रोवली. पुणे जिल्ह्याने दोन 'छत्रपती' दिले. पुण्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, मल्हाराव होळकर, राजमाता अहिल्याराणी होळकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर,  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद साळवे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, सरसेनापती वीर बाजी पासलकर, बहीरजी नाईक, छत्रपती राजाराम महाराज, येसाजी कंक, उमाजी राजे नाईक, तान्हुबाई बिर्जे, सरसेनापती खंडेराव दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे, दर्या सारंग नुरखान बेग, मदारी मेहतर... आदी समाजसुधारकांच्या व महापुरुषांच्या विचारधारेतून हे पुणे नटलेले आहे. हे सांगणे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होय मग आपण या महापुरुषांचा वैचारिक व वारसा आपण जपलं पाहिजे म्हणून त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी म्हणून वैचारिक ठेवा जतण करण्याचं काम आपण केले पाहिजे.हे विसरणे म्हणजे बापाला बाप म्हणणे विसरणे होय,

पुण्याची ओळख जगभर पोहोचली. इथली कर्तुत्वान माती आणि सांस्कृतिक चळवळ समाजासह जगायला अभिप्रेत आहे. त्यामध्ये महा मेट्रोची भर पडली आहे. पुण्यात होणाऱ्या महा मेट्रो स्टेशनला महापुरुषांची नावे देऊन त्यांचा सन्मान करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.लढव्य नेतृत्व हे तरुणाना पेरणा देणारे राहतील तेथेच राष्टप्रेम दिसतील याचा विचार करून 

मेट्रो स्टेशनला देण्यात येणाऱ्या महापुरुषांची नावे खालील प्रमाणे द्या 

१) छत्रपती शिवाजी महाराज.
२) छत्रपती संभाजी महाराज.
३) मल्हाराव होळकर.
४) राजमाता अहिल्या राणी होळकर.
५) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले.
६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज.
७) डाॕ. बाबासाहेब आंबेडकर.
८) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
९) लहुजी वस्ताद साळवे.
१०) दिनकरराव जवळकर.
११) केशवराव जेधे.
१२) सरसेनापती वीर बाजी पासलकर.
१३) महादजी शिंदे.
१४) शिवशाहीर अण्णाभाऊ साठे.
१५) संगीत सूर्य केशवराव भोसले.
१६) सुभेदार तानाजी मालुसरे.
१६) बहीरजी नाईक.
१७) छत्रपती राजाराम महाराज.
१८ येसाजी कंक.
१९) उमाजी राजे नाईक
२०) तान्हुबाई बिर्जे.
२१) सरसेनापती खंडेराव दाभाडे.
२२) सरसेनापती उमाबाई दाभाडे.
२३) दर्या सारंग.
२४) नुरखान बेग.
२५) मदारी मेहतर...असे नावे असून ती रेठून धरण्यासाठी ही मागणी आहे 

महा मेट्रो स्टेशन स्टेशन वरील महापुरुषांचे नाव देण्यात यावे

या मागणीचे निवेदन महा मेट्रोच्या श्री. गाडगीळ साहेब, मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले आहे, यावेळी संभाजी ब्रिगेड'चे महाराष्ट्र प्रदेशसंघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, अॕड. विकास शिंदे, उपाध्यक्ष महादेव मातेरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, सुभाष जाधव, सुनिल जगताप आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...