वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मुकुटबन: भारताच्या इतिहासावर अमीट छाप असणारी महत्त्वाचे स्त्रीरत्न म्हणजे क्रांतिज्योती,स्त्रीशिक्षणाच्या जननी, पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्फूर्तिनायिका, ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांना गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथे जयंतीदिनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून सावित्रीबाई फुले ची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांची जयंती 'बालिका दिन ' व 'महिला शिक्षण दिन' म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो त्याचप्रमाणे गुरुकुल शाळेत हा दिन मोठ्या हर्षोउल्हासात साजरा झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष गजभिये व मराठी शिक्षिका सौ संगीता वैद्य यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती समारंभाची सुरवात केली. यावेळी शाळेचे इतर शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ही सावित्रीबाई फुले यांना कृतग्नतापूर्वक आदरांजली वाहिली. याप्रसंगी शाळेतील वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले च्या जीवनावर आधारित दोन समूह नृत्य सादर केली. यामध्ये अक्षरा चिलकावार, सायली मुद्दमवार, वैष्णवी पवार, स्नेहा मंदावार, समीक्षा कुळसंगे, तक्षशिला नगराळे चा समावेश होता. तसेच वर्ग 8 वी ची विद्यार्थीनी तनुश्री महाजन हिने सावित्रीबाई फुले ची भूमिका साकारून मी सावित्रीबाई फुले बोलतेय यावर एकपात्री अभिनय केला. यादरम्यान तन्मय ताडुरवार वर्ग 8 वी याने महात्मा जोतिबा फुले यांची भूमिका साकारली तसेच देव्यांनी राखुंडे वर्ग 8 वी हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत गायिले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषणे सुद्धा दिली. अशा या माऊलीच्या अमूल्य आदर्शांवर व मुल्यांवर चालण्याचा सदैव प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री गजभिये सरांनी व्यक्त केले. या आदर्श मातेने दलित, उपेक्षित बहुजन समाजातील लेकींसाठी शिक्षणाची दारं खुली करून दिली. उर्मट टीकेला दाद न देता रोष पत्करून स्त्रियांकडून आत्मनिर्भरतेचे धडे गिरवून घेतले. त्यांचे उपकार हा देश कधीच विसरू शकणार नाही.
भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाजकंटकांच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखविले म्हणूनच आजची स्त्री ज्ञान तेजाने तळपत आहे, सावित्री या महान स्त्रिच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम, स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे अगदी शालेय स्तरापासून विद्यार्थिनींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि कार्याची समग्र ओळख होणे आवश्यक आहे. हा केवळ विचार नाही सावित्रीआई फुले चा हा स्त्री- सन्मान मार्ग आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी शिक्षक आशिष साबरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...