Home / यवतमाळ-जिल्हा / घाटंजी / घाटंजी शिक्षणविभागाचा...

यवतमाळ-जिल्हा    |    घाटंजी

घाटंजी शिक्षणविभागाचा अभिनव उपक्रम-'जागर नारीशक्तीचा'

घाटंजी शिक्षणविभागाचा अभिनव उपक्रम-'जागर नारीशक्तीचा'

तालुकास्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ थाटात संपन्न

घाटंजी:  वैविध्यपुर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या घाटंजीच्या शिक्षण विभागाने नवरात्रीच्या निमित्ताने भारतातील कर्तुत्ववान स्त्री शक्तींच्या उल्लेखनीय कार्याचा वैचारिक जागर व्हावा तथा त्यातुन  प्रेरणा घेऊन मुलींनी उत्तुंग झेप घ्यावी या उदात्त हेतूने 'जागर नवशक्तीचा' या उपक्रमाद्वारे सामान्य ज्ञान स्पर्धेचे  बक्षिस वितरण व कर्तुत्ववान महिलांचा सत्कार समारंभ वसंतराव नाईक सभागृह पस घाटंजी येथे आयोजित करण्यात आले.

नवरात्रीला अनोखा शैक्षणिक स्पर्श देत  वर्ग पाचवी ते सातवीच्या मुलींसाठी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतातील राजमाता जिजाऊ, आहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले,भारतरत्न लता मंगेशकर, इंदिरा गांधी आशा विविध क्षेत्रातील नऊ कर्तबगार महिलांची माहिती पुस्तिका स्पर्धंकांना पुरविण्यात येऊन त्यावर आधारित बहुपर्यायी पेपर घेण्यात आला. परीक्षेतून गुणानुक्रमे प्रथम यशवंती प्रवीण राठोड,द्वितीय कोमल मनोज राठोड,तुतीय श्रुती मिलिंद शेलुकर  आशा नऊ विजेत्यांचा  कर्तबगार महिलांच्या हस्ते भव्य सत्कार समारंभात यथोचित गौरव करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्षा जिल्हा परिषद कालींदाताई पवार, सभापती निताताई जाधव, दिवाणी न्यायाधीश एफ टी शेख, जि.प.सदस्या सरिताताई जाधव, पावनीताई कल्यमवार, पंस सदस्या कालींदाताई आत्राम, नयनाताई मुद्देलवार ,पुष्पाताई कोवे, जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे, तहसीलदार पूजाताई मातोडे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर ,गटशिक्षणाधिकारी दीपिका गुल्हाने, माधुरी चिद्दरवार  या मान्यवर महिलांना  'जिजाऊच्या कर्तुत्ववान लेकी' म्हणून सन्मानपत्र, संविधान,  शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जि.प.सदस्य आशिष लोणकर, उपसभापती सुहास पारवेकर, पस सदस्य अभिषेक ठाकरे, यशवंत पवार,रुपेश कल्यमवार, मोहन जाधव, जीवन मुद्देलवार,आकाश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

वैद्यकीय, संरक्षणात्मक, कायदेविषयक व सामाजिक क्षेत्रातील महत्वपुर्ण माहिती मान्यवर नवदुर्गांकडुन देत सुरेख प्रबोधन करण्यात आले. अतिशय प्रेरणादायी संघर्षगाथा व स्वनुभव कथन करत मान्यवरांनी मुलींना उद्बोधन केले. विविध क्षेत्रात महिलांना असलेल्या संधीचे सोने करत स्वताला सिद्ध करण्याचे आवाहन व्यासपिठावरुन करण्यात आले.

या अभिनव ठरलेल्या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पौर्णिमा निमसरकर व तृप्ती भोयर, यांनी केले तर छाया बनसोड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विजयाताई वैध, सुनील बोन्डे, जानराव शेडमाके, मोहन ढवळे, किशोर मालवीय, श्रीकांत पायताडे, आकाश कवासे, मानव लढे, संजय पवार, अरविंद मानकर, राजेंद्र गोबाडे, अतुल वानखेडे, प्रभू राठोड, अनिताताई शिदुरकर, ज्योती घोडे, अर्चना मनोहर,अर्चना दिघडे,चेतना पंधरे,सोनाली गेडाम,अंकिता भितकर या उपक्रमाचे मुळ संकल्पक केंद्रप्रमुख रवी आडे, अविनाश खरतडे यांनी अफाट कष्ट घेतले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  गटसंसांधन केंद्रासह पंचायत समितीने केलेल्या  प्रेरणादायी कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

घाटंजीतील बातम्या

तेली समाज महासंघ घाटंजीच्या वतिने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि सामाजिक कार्यकर्ते सत्कार सोहळा संपन्न

घाटंजी: काल दि. १४ नोव्हेंबर रोज रविवार ला तेली समाज महासंघ आणि श्री संताजी बहुउद्देशीय विकास संस्था घाटंजीच्यावतिने...