Home / चंद्रपूर - जिल्हा / आता लस घ्या, बक्षीस मिळवा...

चंद्रपूर - जिल्हा

आता लस घ्या, बक्षीस मिळवा !

आता लस घ्या, बक्षीस मिळवा !

महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी १२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान बंपर लसीकरण ड्रॉ   

चंद्रपूर, ता. १० : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाचा टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली. त्यानुसार दि. १२ ते २४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.     

मनपा कार्यालयातील सभागृहात महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील लसीकरण आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याबद्दल विचारमंथन करण्यात आले. त्याच अनुषंगाने लकी ड्रॉ उपक्रमाचा निर्णय घेण्यात आला असून, अधिकाधिक नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी केले आहे.

''चंद्रपूर शहर महानगरपालिका - बंपर लसीकरण ड्रॉ''

दि. १२ ते २४ नोव्हेंबर २०२१  

प्रथम बक्षीस - फ्रिज
दुसरे बक्षीस - वॉशिंग मशीन
तिसरे बक्षीस - एलईडी टीव्ही
प्रोत्साहनपर बक्षिसे - १० मिक्सर-ग्राइंडर

टीप - वर निर्देशित कालावधीदरम्यान लसीकरण केंद्रावर येऊन लस घेणारे नागरिकच लकी ड्रॉकरिता पात्र असतील. 
नियम व शर्ती लागू*

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...