वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी शहरातील एन डी गारमेंट मेकिंग प्रशिक्षण केंद्राला पत्रकारांची सदिच्छा भेट.
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) :- चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची वाटचाल औद्योगिक विकास क्षेत्राकडे सुरवात केली आहे. राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या जनहिताच्या योजना ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात महिलांच्या सक्षमीकरणाचा ध्यास मनात घेऊन महीलांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी शहरात एडवॉस गारमेंट मेंकिग या कौशल्य वर आधारित प्रशिक्षण केंद्राचे सुरवात १० जानेवारी २०२१ ला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्रात सुमारे दोन- तीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. एडवॉस गारमेंट प्रशिक्षण केंद्र कोविड- १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता बंद ठेवण्यात आले होते. पण राज्य शासनाने आता शिथिलता दिली असल्याने आता एडवॉस गारमेंट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आता पर्यंत हजारो संख्येने महिलांनी नोदणी केली आहे. नऊशे महिलांना प्रशिक्षणासाठी बॅच सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, येथील महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ब्रम्हपुरी शहरात सुसज्ज एन. डी गारमेंट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश महिलांना एडवॉस गारमेंट मेकिंग चे प्रशिक्षण देऊन गारमेंट उत्पादन मध्ये कौशल्य प्रावीण्य करणे हे आहे. भविष्यात ब्रम्हपुरी शहरात क्लस्टर करिता कच्चा माल घेऊन हा त्यांना पुरविणे जेणे करून रोजगार उपलब्ध होईल. आणि महिलां आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल : विजय वडेट्टीवार (इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री)
या प्रशिक्षण केंद्रात सिंगल निडल शिलाई मशीन, डब्बल निडल शिलाई मशीन, एडवॉस कटींग सेशन, उद्योगिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने गारमेंट निर्मिती साठी आवश्यक सर्व एडवॉस मशीन प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध करून दिले आहेत. सदर गारमेंट प्रशिक्षण केंद्र ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात एक मानाचा तुरा ठरला असून ब्रम्हपुरी शहराची वाटचाल आता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा निर्मिती होत आहे.
भविष्यात ब्रम्हपुरी शहरात गारमेंट क्षेत्रात मोठे उद्योग येण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सदर प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्र शासन व्दारे प्रायोजित असुन प्रशिक्षण हे पुर्णपणे मोफत आहे. या निवासी स्वरूपाच्या प्रशिक्षण केंद्रा मध्ये लॉजिग बोर्डींग ची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी अहमदाबाद, सुरत, नागपूर, येथील प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. व प्रशिक्षणार्थींना एडवॉस मशीन वर प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
हे प्रशिक्षण केंद्र ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात महिलांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे. यामुळे महिलां आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन एन. डी गारमेंट यांच्या कडून करण्यात आले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...