Home / चंद्रपूर - जिल्हा / गडचांदूरकरांनो घ्या...

चंद्रपूर - जिल्हा

गडचांदूरकरांनो घ्या

गडचांदूरकरांनो घ्या

दारू दुकानाला ना-हरकतचा ठराव मंजूर, "भाजप,शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला कडाडून विरोध"

गडचांदुर :- महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम ८(२) नुसार १/४(एक चतुर्थांश) सदस्यांनी विशेष सभा लावण्याबाबत विनंती अर्ज केल्यास नगराध्यक्षांना सभा लावता येते.परंतू याठिकाणी असे कोणत्याही सदस्यांचे अशाप्रकारचे अर्ज नसताना स्वतःच्या अधिकाराने २० जुलै रोजी दुपारी १.३० वा.सभेचे नोटीस सदस्यांना देवून सभा लावली. त्यात एकूण ५ विषय ठेवले असून त्यातील विषय क्रं.४ व ५ हेच विषय नगराध्यक्षासाठी अती महत्वाचे असल्याचे लक्षात येत आहे. जेव्हा की मागील महिन्यात सर्वसाधारण सभा १७ जून रोजी झाली.असे असताना आता सर्वसाधारण सभा लावता आली असती मात्र दारू दुकानाकरीता त्या अर्जदारा सोबत झालेल्या गुप्त करारामुळे नगराध्यक्षा व सत्ताधारी नगरसेवकांना मोठी घाई सुटली व लगेच त्यांनी २० जुलै रोजी तातडीने विशेष सभा लावली.ती केवळ आणि केवळ दारू दुकानाचे नाहरकतसाठी लावल्याचे आरोप विरोधी पक्ष नगरसेवकांनी केला आहे.यातील विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सदरची सभा नियमबाह्य असल्याने सभा रद्द करण्यासाठीचे विनंती अर्ज दिले.परंतू यांच्या अर्जाला मुख्याधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. एवढेच नव्हे तर विरोधी नगरसेवकाला सभेची टिपनी सुध्दा दिली नाही.तेव्हा विरोधी नगर सेवकांनी "टिपनी नाही तर सभा नाही" अशी ओरड करत सभा रद्द करण्याची मागणी केली.

परंतू सत्ताधाऱ्यांचे दारू दुकानासाठी नाहरकत देण्याचा धाडस बघून मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा विरोधी नगरसेवकांच्या मागणीकडे काणाडोळा केल्याचे आरोप विरोधी नगरसेवकांनी केले आहे.तेव्हा विरोधी नगरसेवकांनी सभेची टिपणी नसताना सभा कशी काय घेता ? असे विचारता त्या सभेत वेळेवर सभेत टिपणी दिली त्यावेळी सुध्दा नगरसेवक डोहे यांनी लेखी आक्षेप घेतला.परंतू नगराध्यक्षा तसेच सत्ताधारी नगरसेवकांचे दारू व्यवसाय सोबत संगनमत असल्याने विरोधकांच्या लेखी,तोंडी आक्षेप तसेच प्रभागातील महिलांच्या आक्षेपाला बगल देत सत्ताधाऱ्यांनी एकमताने ठराव मंजूर केला.त्यावेळी भाजपाचे व शिवसेना नगरसेवकांनी कडाडून विरोध केला.सदरचा ठराव जरी सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला असला तरी विरोधी नगरसेवक सदर ठरावावर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करण्याचे मत व्यक्त केले आहे.तेव्हा सदरचे नाहरकत ठराव हरकत ठरू शकतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना गटनेता सागर ठाकुरवार,सरवर भाई,सौ. रजीया शेख ख्वाजा हे तीन सदस्य अनुपस्थीत होते.तर भाजपाचे अरविंद डोहे, रामसेवक मोरे,व शिवसेनेच्या नगरसेविका सौ.गोरे,सौ.कोडापे,सौ.अहीरकर यांनी सभेला उपस्थीत राहून शहरात जुनीच दारू दुकाने भरपुर आहे व आणखी दारू दुकानांना ना-हरकत देवून शहरात दारूचा महापूर आणता का ? असा टोला अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांना हाणला.परंतू ती मंडळी दारू दुकानाचे ना-हरकतच्या जणु नशेत असल्याने काहीही न ऐकता व बोलता ठराव मंजूर केला.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघितला असता शहरात फार मोठे विकास कामाचा ठराव घेतल्याचे जानवत असल्याचे मत विरोधी नगरसेवकाने व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...