वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
आवळगाव रेती घाटाच्या वाळू चोरीच्या वारंवार प्रकाशित बातम्यांची दाखल, निष्क्रिय असलेल्या स्थानिक महसूल विभागावर कार्यवाई ची मागणी.
ब्रम्हपूरी (प्रतिनिधी) : ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव रेती घाटातून दोन पोकलॅण्ड व एक जेसीबी जप्त करण्यात आली असून सदर ची कारवाई चंद्रपूर इथून खनिकर्म विभागाकडून करण्यात आली असल्याने स्थानिक महसूल प्रशासनावर जनतेतून वारंवार निष्क्रिय म्हणून असलेली शंका बघता आता सुज्ञ नागरिकांतून तहसीलदार ब्रम्हपुरी यांच्यावर कार्यवाई ची मागणी होतं आहे.
ब्रम्हपुरी तालुक्याला वैनगंगेने अजस्त्र विळखा घातला असून रेती तस्करांचा येथील रेतीवर डोळा आहे . स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत संगनमत करून ब्रम्हपुरीतील काही राजकीय व्यक्ती गेल्या काही दिवसा पासून आवळगाव घाटावर खुलेआम रेती तस्करी करीत आहेत. मात्र स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती तस्कर तसेच राजकीय लोक गब्बर बनत असून सद्यस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यातील एकही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना स्थानिक महसूल विभागाच्या मर्जीने दिवसरात्र रेतीची वाहतूक रेती माफिया करीत आहेत.
आज गुरुवार दि ८ रोजी पहाटे च्या सुमारास जिल्हातील खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवळगाव रेती घाटावर धाडसी कार्यवाई केली असता खनिकर्म निरीक्षक बंडू वरखेडे यांच्या चमुला नदीपात्रा जवळील अमाप हजारो ब्रास अवैध पणे साठवलेल्या रेती जवळ दोन पोकलांड व एक जेसीबी आढळून आली. सदर जेसीबी जप्त करण्यात आली असून पुढील कार्यवाई करण्यासाठी आवळगाव येथील तलाठी कोरडे याना आदेश देण्यात आल्याची माहिती खनिकर्म निरीक्षक बंडू वरखेडे यांनी सदर प्रतिनिधी ला दिली. तर तलाठी कोरडे यांना संपर्क साधला असता, तुम्ही तहसीलदार ब्रम्हपुरी यांचे कडून माहिती घ्या आम्ही त्यांच्या कडे अहवाल सादर करीत आहोत असे बेजबाबदार उत्तर दिले. त्यांच्या साझा क्षेत्रात होणाऱ्या कार्यवाई चे त्यांना माहिती नसणे व स्थानिक कर्मचाऱ्यांच्या साझा क्षेत्रात जिल्हा विभाग कार्यवाई करत असतांना स्थानिक तलाठी झोपेचे सोंग घेत असल्याने यांच्या निष्क्रियतेवर जिल्हा प्रशासन काय कार्यवाई करतो हे महत्वाचे.
एकीकडे स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ब्रम्हपुरी तील नामवंत "कमिशनखोर" राजकीय व्यक्तीचे रेती तस्करीतून हितसंबंध जोपासून चांग भले केले जातं असतांना सदर कार्यवाई बाबत जिल्हा महसूल प्रशासनातील अधिकारी काय कार्यवाई करतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...