Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / उपोषणकर्ते तरुणांची...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

उपोषणकर्ते तरुणांची खाजगी कंपनीकडून दिशाभूल करून फसवणूक..!

उपोषणकर्ते तरुणांची खाजगी कंपनीकडून दिशाभूल करून फसवणूक..!
ads images

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी): मुकुटबन येथे दोन मोठ्या खाजगी कंपनी असून दोन्ही कंपनीत परप्रांतीय लोकांचा भरणा करून स्थानिक तरुणावर या कंपन्या अन्याय करीत आहे. त्यामुळे मुकुटबन सह तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी एल्गार पुकारून  2 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाला तालुक्यातील विविध राजकीय,सामाजिक,ग्रामपंचायत ,पत्रकार,व सामाजिक संघटनेने पाठिंबा दर्शविला होता.उपोषणा दरम्यान काही राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधीनी भेटी दिल्या व समस्या जाणून घेतल्या परंतु मार्ग काढण्यात अपयशी ठरले.अखेर 4 ऑगस्ट ला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे संचालक राजीव येल्टीवार,प्रवीण कासावार,सुनील ढाले, ओम ठाकूर, वासुदेव विधाते, राहुल दांडेकर, हरिदास गुर्जलवार, मंगेश पाचभाई,केशव नाकले, सुरेंद्र गेडाम, यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कंपनीला झुकावे लागले व तरुणांच्या मागण्या लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आल्या होत्या. 15 ऑगस्टला 20 जणांना, सप्टेंबर महिन्यात 10 व ऑक्टोबर महिन्यात 10 असे तरुण कामावर घेतील व उर्वरित 248 तरुण टप्या टप्प्याने घेण्यात येईल असे तहसीलदार गिरीश जोशी,गटविकास अधिकारी गजानन मुंडकर पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड समस्त ग्रामवासिया समक्ष लिहून देण्यात आले होते. 

परंतु एक महिना लोटूनही बीएस इस्पात कोळसा कंपनीकडून एकही तरुणांना रोजगार न देता एका लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली तरुणांची दिशाभूल करून फसवणूक करीत असल्याचा आरोप उपोषण कर्ते  करीत आहे.  अखेर सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्त तरुण युवक  22 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात धडकले व तहसीलदार याना निवेदन देऊन इस्पात कंपनीने दिलेले आश्वासन पूर्ण करून तरुणांना कंपनीत नौकरी द्या अन्यथा सर्व तरुण आत्मदहन करणार व याला जवाबदार प्रशासन व कंपनी राहणार असा इशारा दिला. कंपनीने लेखी तर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी  उपोषण मंडपात तोंडी तर कंपनीने लेखी आश्वासन  दिले होते त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. तरुणांनी तहसीलदार यांच्या कॅबिन मध्ये आमदार बोदकुरवार व तहसीलदार यांना तरुणांनी कंपनी बेरोजगार  युवकांना नौकरीवर का घेण्यात आले नाही असा जाब विचारले परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही . व बेरोजगार युवकात व आमदार यांच्यात बहसबाजी झाली. तरुणांनी आमदार यांना तुमचे कार्यकर्ते आम्हाला धमकावत आहे ,तुम्हाला नौकरी कशी लागते आम्ही पाहतो" असे धमकावीत आहे असे सांगण्यात आले. 

बेरोजगार युवकांनी  उपोषण केले परंतु  बेरोजगार तरुणांची यादी मुकुटबन ,अर्धवन व भेंडाळा ग्रामपंचायतने आपले नातेवाईक व कार्यकर्त्या लोकांची यादी नौकरी करिता कशी दिली असा संतप्त प्रश्न उभा केला. " "मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर" अशी अवस्था राजकीय नेते व पुढार्यांनी आणून ठेवल्याची परिस्थिती  आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो तरुणांत प्रचंड संताप उफाळला आहे  व उपोषण करते तरुणांची मानसिकता खराब झाली आहे. 3 दिवसात कंपनीने तरुणांना नौकरिवर न घेतल्यास उपोषणकार्ये तरुण आत्मदहन करणार असा इशारा देताच तहसीलदार यांनी कंपनीला फोनद्वारे जाब विचारला असता कंपनीने मुकुटबन ,अर्धवन व भेंडाळा ग्रामपंचायतच्या पत्राचे संदर्भ लिहून उत्तर पाठविले.  उपोषण कर्ते तरुणांचा प्रश्न असतांना वरील ग्रामपंचायतच्या पत्राचा समंध आला कुठून असा प्रश्न तरुणांनी उपस्थित केला. 

 तरुणांच्या उपोषणाचा फायदा राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी करून राजकारण करीत असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे संबधीत लोकप्रतिनिधी व स्वयंघोषित पुढाऱ्यांविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे. त्रस्त झालेल्या उपोषण कर्ते तरुणांना 3 दिवसात न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचे तहसीलदार सह वरीष्ठ अधिकारी  ,पंतप्रधान संबधीत सर्व विभाग व महाराष्ट्रातील नेते याना दिलेल्या नीवेदनातून केले आहे. निवेदन देतेवेळी आझाद उदकवार, सुनिल जिनावार, अनुप ढगडी, पंढरी धांडे, उमेश पोतराज, श्रीकात पेटकर, जयंत उदकवार, अभय मेश्राम , अंकुश लेनगुळे, प्रतिक गेडाम,गौरव मेश्राम , गणेश उदकवार, कालिदास अरके, शुभम जींनावार, अविभारा सिन्नमवार, निलेश जाभुळकर, मारोती तुरणकर,निलेश बेलेकर, रितेश गावडे,बांधूरकर,गजजन वासाडे, व अक्षय झाडे उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...