*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर: सिपेट हे चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षण व रोजगार देण्याच्या दृष्टीने एक महत्वाकांक्षी पाऊल असून निर्माणाधीन इमारतीत कौशल्य प्राप्तीसाठी प्रशिक्षणार्थींना प्रत्येक तांत्रिक व इतर महत्वपूर्ण सोयी सुविधा युक्त इमारत असल्याचे समाधान पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ताडाळी येथील सिपेटच्या निर्माणाधीन देखण्या इमारतीची पाहणी करतांना व्यक्त केले.
या भेट प्रसंगी सिपेट चंद्रपूरचे सहसंचालक व प्रमुख मिलिंद भरणे, भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, भाजपा जिल्हा महानगर उपाध्यक्ष मोहन चौधरी, पडोली ग्राम पंचायत सदस्य विक्की लाडसे, मुकेश यादव, राहुल बोरकर, तुषार मोहुर्ले यांची उपस्थिती होती.
केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री पदाची कमान खांद्यावर असतांना चंद्रपूर व इतर नजीकच्या जिल्ह्यातील युवकांना प्लास्टिक अभियांत्रिकी व तांत्रिक प्रशिक्षण मिळावे व त्यातून विस्तृत रोजगार तसेच स्वयंरोजगार निर्माण व्हावा अशी संकल्पना समोर मांडून आपण हे सिपेट हा अभिनव प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर केला होता असे यावेळी अहीर यांनी सांगितले.
सिपेटच्या माध्यमातून २४०० प्रशिक्षणार्थीना प्लास्टिक तंत्रज्ञान डिप्लोमा पद्धतीचे धडे मिळणार असून यातून अभिनव तंत्रज्ञान व रोजगारनिर्मिती होईल असा विश्वास यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. आजपावेतो सिपेट च्या माध्यमातून जवळपास २००० प्रशिक्षणार्थींना ३ - ६ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले असून जवळपास १८०० प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळाल्याचा समाधान यावेळी अहीर यांनी व्यक्त केला.
सिपेट ची निर्माणाधीन इमारत हि सर्व सुविधा, प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण तांत्रिक उपकरणे, निवास, भोजन व्यवस्था अशा सुविधांनी पूरक असल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्जन करतांना त्यांच्या विद्यार्थी जीवनातील एक सुखद अनुभव मिळेल असेही यावेळी अहीर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सिपेट या अभिनव व महत्वाकांक्षी प्रशिक्षणाची माहिती घेत लाभ घेण्याचे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...