वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): शासन निर्णयाचे पालन करत आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुर्ला ता.झरी जामनी येथील शाळा व्यवस्थापन समिती चे पुनर्गठन करण्यात आले. उपस्थित सर्व पालकातून १५ सदस्यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीवर करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून श्री महेंद्र मेश्राम, उपाध्यक्ष सौ.मीनाताई गजानन कनाके,तर सदस्य म्हणून सोमेश्वर घुगुल, सौ.सुवर्णा धानोरकर, अरविंद घोरपडे, संतोष आत्राम, शुभांगी सराटे, विठ्ठल कोडापे, सौ.सपना दुधगवळी , शिक्षणतज्ञ सौ.सुषमा किशोर दुधगवली , ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश ढोरे, शिक्षक सदस्य श्री राजेश मेश्राम, विध्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून शौर्य मंगेश ढोरे, व कु.स्नेहल बाबाराव मडावी यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक श्री रमेश बोबडे यांनी काम पाहिले. निवड प्रकियेचे सनियंत्रण श्री सुरेश पेंढरवाड व श्री राशेज मेश्राम यांनी केले.शाळा व्यवस्थापन समितीच्या सत्कार कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सुर्ला च्या सरपंच सौ.उषाताई दिवाकर कुडमेथे, उपसरपंच श्री चंद्रशेखर मेश्राम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री रामभाऊ आत्राम उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीवर निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ग्रामपंचायत सुर्ला व शाळा व्यवस्थापन समिती सुर्ला यांच्या कडून श्री सुरेश पेंढरवाड यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला श्री गंगाधर बलकी, सर्व पालक व विध्यार्थी उपस्थित होते.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...