आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी वन विभागाच्या बेबंदशाही, क्रूर वर्तनामुळे निरपराध दलित, आदिवासींवर सातत्याने अमानुष अत्याचार होत आहेत. या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांचेवर विविध आरोप लावून खोट्या प्रकरणांमध्ये गोवण्याचा वनविभागाचा प्रयत्न सुरू आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) श्री. गुरुप्रसाद या मुजोर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हा सर्व प्रकार घडत आहे असा आरोप राजु झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या अमानवीय अन्याय अत्याचाराविरोधात येत्या १२ जानेवारीला तीव्र जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी द्वारा देण्यात आला आहे.
वन विभाग सध्या त्यांच्या जनविरोधी निरंकुश व हुकूमशाही वृत्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असून वारंवार वनविभागाकडून जंगलालगतच्या निरपराध गरीब, दलित, आदिवासी युवक तरुणांवर व शेतकऱ्यांवर अमानवी अत्याचार सुरू आहेत. जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली असो की, शिकारीच्या संशयावरून असो येथील लोकांच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न वन विभाग करीत आहे. जंगलालगतच्या शेतकऱ्यांना मारझोड करणे, त्यांच्या जमीनी उध्वस्त करणे, गरीब दलित आदिवासी युवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अमानवीय मारझोड करणे. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन ताडोबा क्षेत्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद व त्यांचे अधिकारी करत आहेत.
याविरोधात जंगलालगतचे गावकरी राजू झोडे यांना न्याय हक्कासाठी आर्त हाक देत असतात. राजु झोडे कशाचीही पर्वा न करता होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवतात. वन विभागाला हुकूमशाही व बेबंदशाही यावर पाबंदी आणण्याचे काम प्रशासनाकडून राजू झोडे करून घेतात. त्यामुळेच वन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राजु झोडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जनतेचा आवाज दाबण्याचा काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वनविभागाच्या या अमानवीय अन्याय अत्याचाराविरोधात तीव्र आवाज बुलंद करण्यासाठी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी द्वारा तीव्र आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा राजु झोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शासन व प्रशासनाला दिला.
कृपया ही बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्र, न्यूज चैनल, पोर्टल वर प्रसिद्ध करावी ही विनंती
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...