वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
सरपंच पदी अनुताई ताजने व उपसरपंच पदी बाळा पावडे यांची निवड, आशिष ताजने यांच्या विकासकामांवर जनतेचे शिक्कामोर्तब
भारतीय वार्ता (प्रतिनिधी कोरपना): कोरपना तालुक्यातील बहुचर्चित नारंडा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड नुकतीच झाली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीची सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता प्राप्त झाली आहे.यामध्ये सरपंचपदी अनुताई वसंतराव ताजने व उपसरपंचपदी बाळा विठ्ठल पावडे यांची निवड झाली आहे.
नारंडा ग्रामपंचायतमध्ये ९ सदस्य असून हि निवडणूक जिल्ह्याचे लोकनेते,विकासपुरुष माजी वित्त नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर,राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली.
यामध्ये भाजपाला ९ पैकी ७ जागा जिंकण्यात यश प्राप्त झाले.व शेतकरी संघटना १ कांग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधी असणारे दोन्ही पक्षांनी एकत्रित होऊन युती करून निवडणूक लढवली परंतु जनतेने युतीला नाकारत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने स्पष्ट जनादेश देत कौल दिला.
भारतीय जनता पार्टीतर्फे अनुताई ताजने, बाळा पावडे,अनिल शेंडे,रुपाली उरकुडे, रंजना शेंडे,शालू हेपट,बापूराव सिडाम हे ७ उमेदवार बहुमताने विजयी झाले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वात आशिष ताजने यांनी नारंडा गावात अनेक विकासकामे खेचून आणत गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला.व गावातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहिले.त्याचीच पावती म्हणून जनतेने भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता प्राप्त करून दिली.
या निवडणुकीत सुरेश पाटील परसुटकर,नागोबा पाटील उरकुडे,महादेव खाडे,अनिल मालेकर,अजय तिखट,सत्यवान चामाटे,प्रवीण हेपट,अरविंद खाडे, मंगल वांढरे,रामा शेंडे,अनिल वाडगुरे,सुरेश शेंडे,रवींद्र कांबळे,अरुण सोनपितरे,भगवान आत्राम,बाल्याभाऊ बोढे,नामदेव घुगुल,अनिल निरे,गजानन चतुरकर,अरुण निरे,मारोती बोबडे,सुभाष डवरे,संतोष पावडे,संजय चहानकर,प्रदीप उरकुडे,अरविंद पावडे,महेश बिल्लोरिया,सचिन दवंडे,संतोष वांढरे,बाळा गाडगे,मंगल खाडे,संतोष ताजने,बाल्या नागोसे, अजय काकडे,विनोद काथवटे,अमोल ताजने,प्रमोद शेंडे,गणेश पावडे, अजय शेंडे, भिकाजी घुगुल,वैभव गंगमवार,आशिष निवलकर, संदीप चौधरी,देवा पेटकर,मनोज तिखट,शंकर चाहारे,यांनी अथक परिश्रम केले.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...