Home / विदर्भ / विदर्भ व मराठवाडयाच्‍या...

विदर्भ

विदर्भ व मराठवाडयाच्‍या विकासासाठी वैधानिक विकास मंडळाची घोषणा त्‍वरित करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

विदर्भ व मराठवाडयाच्‍या विकासासाठी वैधानिक विकास मंडळाची घोषणा त्‍वरित करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

मुंबई (वृत्तसंस्था): विदर्भ व मराठवाडयाच्‍या विकासासाठी वैधानिक विकास मंडळाची घोषणा राज्‍य शासनाने आज त्‍वरित करावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.

वैधानिक विकास मंडळाच्‍या स्‍थापनेबाबत मुद्दा उपस्थित करत आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, सर्व विभागांचा समतोल विकास आणि निधीचे समन्‍यायी वाटप करण्‍यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्‍थापना करण्‍यात आली. दांडेकर समितीच्‍या अहवालानुसार जो अनुशेष होता तो भरण्‍याची प्रक्रिया आता वेगाने सुरु झाली आहे असे असताना मुदत संपल्‍यानंतरही वैधानिक विकास मंडळांची स्‍थापना करण्‍यात आलेली नाही. अर्थमंत्र्यांनी कितीही सांगीतले की मी निधी वाटपात अन्‍याय होवु देणार नाही तरीही वैधानिक विकास मंडळांचे कवच कायद्यानुसार अतिशय गरजेचे आहे. आपण आज विधानसभागृहात पुरवणी मागण्‍या मांडल्‍या. त्‍यांना ३७१ (२)च्‍या तरतुदी लागू आहेत काय असा सवाल आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केला.

विदर्भातील वाशिम, अमरावती, अकोला या भागात आजही मोठया प्रमाणावर अनुशेष आहे. हा अनुशेष भरुन काढण्‍याच्‍या दृष्‍टीने वैधानिक विकास मंडळाचे कवच आवश्‍यक आहे. आज विजेच्‍या थकबाकीकडे आपण दृष्‍टीक्षेप टाकला तर चंद्रपूर जिल्‍हयाची कृषी पंपांची विज थकबाकी ८० कोटी इतकी आहे तर बारामती सर्कलची हीच थकबाकी २ हजार कोटी इतकी आहे. विदर्भ व मराठवाडयावर निधी वाटपात अन्‍याय होवु नये, या संदर्भात कोणत्‍याही प्रकारचे राजकारण करु नये अशी अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली. आधी वैधानिक विकास मंडळांची स्‍थापना करावी आणि मगच अर्थसंकल्‍प मांडावा असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी अर्थमंत्र्यांना केले. 

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...