वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
अनाथ झालेल्या बालकांना मिळणार बालसंगोपन योजनेचा लाभ
चंद्रपूर दि.15 जुलै: कोविडमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहे अशा अनाथ झालेल्या बालकांची माहिती घेऊन त्या बालकांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपस्थितांना दिलेत.
कोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी आयोजित कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासमवेत, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, मनपा उपायुक्त अशोक गराटे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. वर्षा जामदार, महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर, उपशिक्षणाधिकारी( माध्य)पुनम मस्के, प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले की, ज्या पालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहे अशा बालकांची तालुका स्तरावरून माहिती गोळा करून घ्यावी. तसेच अनाथ झालेल्या बालकांच्या मालमत्ता सुरक्षित करण्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना जबाबदारी सोपविली असून त्याबाबत योग्य कार्यवाही करावी.
जिल्ह्यात आतापर्यंत कोविडमुळे 1533 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक पालकांचा समावेश आहे याची खातरजमा करून घेण्यासाठी आरोग्य विभागामार्फत डेथलिस्ट व संपर्क क्रमांक घेऊन सदर मृत व्यक्तीची माहिती कॉलसेंटरद्वारे कॉल करून प्राप्त करून घ्यावी असेही ते म्हणाले.
तसेच कोविडमुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठीच्या योजना व लाभाची माहिती कॉलसेंटर द्वारे कॉल करून द्यावी. तसेच बालकांना कशाप्रकारे बालसंगोपनाचा लाभ देता येतो याची माहिती सुद्धा तालुकास्तरावर देणे गरजेचे आहे, जिल्ह्यात 0 ते 18 वर्ष वयोगटातील 279 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार असून त्यांना 1100 रुपये प्रति महिना लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यावेळी म्हणाले.
यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील कोविडमुळे विधवा झालेल्या 164 महिलांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाचा लाभ देण्याकरिता संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना माहिती पुरविण्यात आलेली आहे. आतापर्यंत 29 कोविड विधवा महिलांना लाभ देण्यात आलेला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या मालमत्ता सुरक्षित करण्यासंबंधीची माहिती जाणून घेतली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...