Home / चंद्रपूर - जिल्हा / मत्स्यव्यवसाय विभागाकडुन...

चंद्रपूर - जिल्हा

मत्स्यव्यवसाय विभागाकडुन तालुकास्तरावर किसान क्रेडिट कार्ड मेळाव्याचे आयोजन

मत्स्यव्यवसाय विभागाकडुन तालुकास्तरावर किसान क्रेडिट कार्ड मेळाव्याचे आयोजन

 मच्छीमारांच्या आर्थिक प्रगतीकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना

चंद्रपूर दि. 26 नोव्हेंबर: केंद्र शासनाकडून सामान्य मच्छीमारांच्या आर्थिक प्रगतीकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात आला आहे. या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील मच्छिमार तसेच खाजगी मत्स्यसंवर्धक यांना मत्स्यव्यवसायाकरिता लागणारे आवश्यक भांडवली साहित्य जसे की, मासेमारीकरिता वापरण्यात येणारी सामुग्री, मत्स्यबीज, मत्स्यखाद्य, खते आदी साहित्य खरेदीकरिता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सहज भांडवल उभारणे शक्य होऊ शकेल. त्याकरिता इच्छुक मत्स्यसंवर्धकांनी त्यांचे स्वतःचे खाते असलेले राष्ट्रीयीकृत बँक अथवा सहकारी बँकेशी संपर्क साधून बँकेला अर्ज सादर करावा.

किसान क्रेडिट कार्डचा लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील विविध बँका व मत्स्यव्यवसाय विभागाच्या समन्वयाने तालुकास्तरावर किसान क्रेडिट कार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळाव्यात इच्छुकांकडून थेट अर्ज भरून घेण्यात येणार आहे. तरी, इच्छुक मत्स्यसंवर्धक, मच्छिमार, मत्स्यपालन सहकारी संस्था, बचतगट यांनी किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शेतीचा सातबारा, तलाव, जलाशय करारपत्र व इतर आवश्यक  कागदपत्रे घेऊन मेळाव्यात उपस्थित रहावे.

सदर मेळाव्याचे आयोजन नागभीड येथे दि.3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता, पंचायत समिती नागभीड, दि. 10 डिसेंबर रोजी  पंचायत समिती, बल्लारपूर, दि. 17 डिसेंबर रोजी पंचायत समिती पोंभूर्णा तर दुपारी 2 वाजता गोंडपिंपरी, दि. 24 डिसेंबर रोजी पंचायत समिती, सावली तर दुपारी 2 वाजता पंचायत समिती मुल, दि.31 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा परिषद शाळा सिदेंवाही, दि. 7 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती चिमूर, दि. 14 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती गडचांदूर तर दि. 21 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती ब्रह्मपुरी येथे आयोजित केले जाणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड मार्फत कर्ज प्राप्त करण्यासाठी बँकेच्या विहित अटी व शर्तींची पूर्तता करून लाभार्थी मत्स्यसंवर्धकास योजनेचा लाभ घेता येईल. तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मत्स्यसंवर्धक, मच्छिमार, मत्स्यपालन सहकारी संस्था, बचतगट यांनी केंद्र शासनाच्या कल्याणकारी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायामध्ये भांडवली खर्चाची व्यवस्था करण्याबाबतचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. बळकटे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...