Home / चंद्रपूर - जिल्हा / अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील...

चंद्रपूर - जिल्हा

अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू व्यापारी गणेश गुप्ता गोंदिया पोलीसांच्या ताब्यात

अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील  सुगंधित तंबाखू व्यापारी गणेश गुप्ता गोंदिया पोलीसांच्या ताब्यात

सुगंधित तंबाखू व ट्रक सहीत 22,41,670/- रुपयाचा मुदेमाल जप्त.

चंद्रपूर जिल्हातील केवळ एकच मोठा सुगंधित तंबाखू व्यापारी म्हणून ओळख निर्माण करणारा गणेश गुप्ता चंद्रपूर जिल्ह्यात आपली वेगळी ओडख निर्माण करत होता व इतर व्यापाऱ्यांना त्यांनी मागे टाकून सर्वात मोठी बोली लावून सर्वावर त्यांनी मात केली मात्र तो आज गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे यांच्या हाती लागला असून त्याला जवळपास 22 लाखांच्या मुद्देमालसह अटक केल्याने एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे भारतीय वार्ता पोर्टल वरती या अवैध सुगंधित तंबाखू विक्रेता वसीम,जयसूक,जीतु,नुतन गणेश संदर्भात बातम्यांची मालिका सुरू होती व त्यात गणेश गूप्ताला जिल्ह्यात सुगंधित तंबाखू विकण्याची खुली सूट देण्यात आल्याची माहिती प्रकाशित केली होती.

गुप्त  माहितीनुसार रायपुर वरुन नवेगावबांधकडे निघालेल्या एका ट्रकमध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधी तंबाकुची वाहतुक होत असल्याची माहीती दि. 26/10/2021 रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे यांना एका मुखबीर कडुन मिळाली, त्या माहीतीच्या आधारे डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांनी सहकारी पोलीस अमलंदारा सोबत नवेगाव टी पांईट कोहमारा चौक नाकाबंदी करुन सदर ट्रकची तपासणी सुरु केली असता ट्रक क्र.एम.एच. 40 बि.जी – 3444 त्यामध्ये,27 बॉक्स ज्यामध्ये सुगंधीत तंबाकु (मजा 108) चे 500 ग्रमचे 538 बॉक्स किं. 10,25,670/- व 10 प्लास्टिक पोती ज्यामध्ये सुगन्धित तंबाकु (ईगल) चे 400 ग्रॅमचे 400 पॅकेट एकुण कि. 2,16000/- रुपये व ट्रक अंदाजे कि.10,00000/- असा एकुण किंमती 22,41,670/- रुपयाचा मुदेमाल पो.स्टे.ला जमा करुन ट्रकमधील प्रतिबंधीत सुगन्धित तंबाकु बाबत भंडारा येथील अन्न सुरक्षा सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन भंडारा यांना पत्राव्दारे कळविण्यात आले त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करुन त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आरोपी शाहरुख नासिर खान वय 27 वर्षे रा. नागपुर व गणेश गुप्ता रा.चंद्रपुर यांचे विरुदध अप. क्र. 280 /2021 कलम 188, 272, 273,328 भादवी सहकलम 3,26 (2)(i), 26 (2) (iv) ,27 (2) (e) ,30 (2) (a), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 यानुसार गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...