शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वणी- कोरोनाची दुसरी लाट आली जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले कोरोना रुग्णाची संख्या पटीने वाढत आहेत त्यातून ग्रामीण भाग सुद्धा सुटला नाही कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला जेणेकरून लोकांची गर्दी नियंत्रणात येईल हे असताना प्रामाणिक पणे रोजची रोजीरोटी बंद करून सरकारच्या आदेशाने लोकांच्या हितासाठी दुकाने बंद करून घरी बसले आहे. सुलून, हार्डवेअर,ग्यारेज,मोबाईल, इलेक्ट्रिक,बिछायत केंद्र असे अत्यावश्यक सेवा नसलेले दुकान बंद असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
मात्र या सर्वाला अपवाद म्हणजे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजणारे काळे धंदे करणारे रेती तस्कर वर्धा नदीतून पाटाळा, भुरकी -राळेगाव, निर्गुडा नदी,शेवाडा जगली नाला पैनगंगा नदीच्या घाटावरून रात्री दिवसाला परवानगी नसताना सुद्धा मोठमोठया ट्रक लावून नजीकच्या शेतात जमा करतात आणि दिवसभर तिची उचल करतात.
कारण प्रशासन हे कोरोना काळात लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त असताना हे लोक मात्र त्यांच्यावर असलेण्या अतिरिक्त ताणाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर रेती काढून भरपूर पैसे कमविण्यात मग्न आहे.मात्र जनसामान्य माणूस माणुसकी जपून शासनाच्या आदेशाचे पालन करून स्वतःच्या आनंदावर विरजण घालून आर्थिक नुकसान सहन करत आहे. हे खरंच लज्यास्पद परंतु सत्य आहे.
तेव्हा सामान्य जनतेकडून अशा अवैध रेती तस्करांवर महसूल विभागाने कायमस्वरूपी कारवाही करावी असा सूर ग्रामीण भागातून येताना दिसतो.जेणेकरून प्रामाणिक आणि नेकदिल माणसानी या कोरोना काळात केलेल्या त्यागाला आणि जीव गमावलेल्या लोकांना खरी मानवंदना मिळेल.
असा आशावाद होत असला तरी पैसा हा सर्व सुखाची जननी असल्याचे कारण समोर करीत वाटेल तेथून रेती उचल सुरु असून गणेश डाहुले शिरपूर याच्या मालकीच्या शेत सर्व्हे नं 73मधून रेती तस्करांनी हजारो ब्रास रेतीची उचल केली असून लीज घाटा पेक्षा बाहे क्षेत्रातून रेती उचल मोठया प्रमाणात होत आहे, शेतकरी यांनी शासन जी आर 2016च्या आधारावर मागणी केली असताना मात्र स्थानिक तहशीलदार यांनी केराची टोपली दाखवीत शासन महसूल घेण्यापेक्षा रेती चोरांना रान मोकळे करून रेती माफियाचे चांगभले होत आहे, याचा अर्थ काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात असून माफिया राजला आशीर्वाद तर कोणाचा यावरून गणेश रामकृष्ण डाहुले यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दि 29एप्रिल 2021रोजी 12.45वाजे दरम्यान फिर्याद नोद केली असून दि 28एप्रिल रोजीच्या सायंकाळी 5-00 वाजे दरम्यान फिर्यादी शेताकडे गेले असता गट क्र 73 मधील निर्गुडा नदी पात्रातील ट्रॅक्टर क्र. एम एच 34बी वी 0477 हा ट्रॅक्टर चालक सुनील आसुटकर (40) मु. पुनवट हा रेती भरत असताना विचारना केली असता मला ट्रॅक्टर मालक रवी चितलवार (55)मु. घुग्गुस. जि. चंद्रपूर यांनी सांगितले असून त्या वेळी चालक यांनी मालक यास बोलावून घेऊन तु कोण होय ट्रॅक्टर थांबवायला असे करतील तर बघ, अशी वैक्तिक स्वार्था साठी तंबी देऊन घटना स्थळावरून निघून गेला, भविष्यात जीविताला धोका असल्याचे कारन लक्षात घेऊन फिर्याद दाखल केली असून फिर्यादीच्या तक्रारी वरून एन सी आर अंतर्गत धारा 155द. प्र. सं. भारतीय दंड संहिता 1860च्या 506अन्वय गुन्हा नोद केला असून ह्या फिर्यादीच्या तक्ररारी कडे सर्वांच्या नजरा लागल्या असून महसूल तो प्राप्त करतील का? या कडे जरी नजरा लागून असल्या तरी महसूलाची उदासीनता न्यायलयाची वाट दाखवून तर स्वतःच्या पायावर कुदळ तर मारून घेणार नाही ना ? असा सवाल महसूल उदासीन कारणाने समोर येत असून वाचवनार तर कोणाला खाईल त्याचे तर गाईल कोणाचे असा प्रश्न ह्या निमित्याने निर्माण झाला आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...