आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
भद्रावती (तालुका प्रतिनिधी): जालना येथील मागासवर्गीय युवक व भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना अमानुषपणे बेदम मारहाण करणा-या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजयुमोचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
येथील तहसीलदार महेश शितोळे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना येथील भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे त्यांच्या बहिणीची प्रकृती ठीक नसल्याने एका रुग्णालयात गेले. तेथे गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाताने मृत्यू झाला होता. तेथे पोलिस मृतकांच्या नातेवाईकांना आणि गवळी समाजाला अपशब्द वापरुन शिवीगाळ करीत होते. हा प्रकार शिवराज यांना सहन झाला नाही. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ शुट केला. ही बाब संबंधित पोलिस अधिका-यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या कर्मचा-यांना शिवराजला मारण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी शिवराजला अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे.
अमानुषपणे मारहाण करणा-या पोलिस अधिकारी-कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा भाजयुमोतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. यापुढे युवकांना अशी विनाकारण होणारी अमानुष मारहाण भाजयुमो कदापि सहन करणार नाही. असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदन सादर करताना इम्रान खान, मोनू पारधे, श्रीपाद भाकरे, विशाल ठेंगणे, नाना हजारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...