वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांची मागणी, गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.
ब्रम्हपुरी(प्रतिनिधी):- ब्रम्हपुरी नगरपरिषदेने शहरात खनिज निधी अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाईन चे काम मोठ्या जोमात सुरू आहेत. ब्रम्हपुरी शहरातील रोडचे खोदकाम करून पाईप लाईन टाकण्यात येत आहे. ब्रम्हपुरी शहरालगत खेडमक्ता ही स्वतंत्र ग्रामपंचायत असुन ब्रम्हपुरी शहरात सुरू असलेल्या पाईप लाईन चे खोदकाम करण्याअगोदर संबंधित विभागा कडून रितसर परवानगी घेण्यात आली नाही. ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा कोणत्याही प्रकारचा भाग खेडमक्ता ग्रामपंचायत हद्दीत नसताना सुद्धा पाणी पुरवठा पाईप लाईन चे अनाधिकृत खोदकाम सुरू आहे.
सदर खोदकाम आज सुरू करण्यात आले होते आणि ते खोदकाम पुर्ण बुजविण्याचे सुध्दा काम करणार होते. पण उपसरपंच येऊन कामात अडथळा निर्माण केला. त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्या सुध्दा उपस्थित होत्या. कुठल्याही प्रकारची शिवीगाळ करण्यात आली नाही. उपसरपंच हा एकेरी शब्दाचा वापर करून कामगारांना बोलत होता. सदर खोदकाम झालेल्या ठिकाणी बॅरेकॅटस लावण्यासाठी सांगितले आहे. सदर आरोप बिनबुडाचे आहेत :- मंगेश वासेकर (मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी)
सदर खोदकाम नागरिकांच्या येणे - जाण्यासाठी मुख्य रस्ता असुन यावर सुमारे चार फूट रुंद व बारा फुट लांब असे खोदकाम अनाधिकृत खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम करताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुचना फलक, बॅरिकेड्स,इतर कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. सदर खोदकामामुळे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रस्त्याने जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम जात असताना खोदकाम करणाऱ्या कामगारांना विचारले असता सीईओ (मुख्याधिकारी) साहेबांचा आदेश असल्याचे सांगितले. सदर मौक्यावर खेडमक्ता ग्रामपंचायत चे उपसरपंच दिपक देशमुख, शेखर बोरघरे, महेश सोनकुसरे, गणीखॉ मेश्राम, उपस्थित होते. काही वेळातच ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर त्या ठिकाणी पोहोचले. जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम या लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित असताना सुध्दा उपसरपंच व गावातील नागरिकांना जोरजोराने शिवीगाळ करून ते कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. व तिथून निघून गेले. सदर केलेले खोदकामने अपघातास आमंत्रण दिले जात आहे. या रस्त्याने खेडमक्ता येथील नागरिकांना ब्रम्हपुरी शहरात कामानिमित्त दुचाकी, चारचाकी ने प्रवास करावे लागते. आणि सदर खोदकामामुळे जिवितहानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर खोदकाम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी रितसर परवानगी घेतली नाही. आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आले नाही. असे बेजबाबदार, वादग्रस्त मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...