मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
महागाव : भाजपचे मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसल्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण राबविण्याच्या सपाटा लावला असून जनतेचा मालकीचे सर्वच क्षेत्र उदारपणे देशातील भांडवलदारांना देणे सुरू केले आहे. याचाच अर्थ हा देश भांडवलदारांना देण्यासाठी देशातील अन्नदाता शेतकरी यांची शेती घालविणे व देश आपल्या मेहनतीने घडविणाऱ्या कामगाराचे अधिकार नाकारणे आणि ज्यांना आपला देश भविष्यात घडवायचा अहेअश्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे खाजगीकरण करून त्यांना शिक्षणापासून वंचित करणे होय. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मारून टाकणाऱ्या ह्या भाजपच्या मोदीसरकारला सत्तेवरून बेदखल करण्यासाठी लाल झेंडे हातात घेऊन रस्त्यावर येऊन संघर्ष करा. असे जोरकसपणे महागाव येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका अधिवेशनामध्ये कॉ. शंकरराव दानव यांनी आवाहन केले.
दर तीन वर्षांनी होणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात गेल्या तीन वर्षातील लेखाजोखा सादर करून नवीन कार्यकारिणी व नवीन सेक्रेटरी निवडल्या जातो. त्यानुसार महागाव तालुक्याचा सेक्रेटरी म्हणून माजी जि. प. सदस्य कॉ. देविदास मोहकर यांची सर्वानुमते निवड करून डी. बी. नाईक, इसाक भाई, परशराम बरडे, नानाभाऊ पानपट्टे, पांडुरंग मुडे, दयाराम जाधव, रमेश जाधव, एन. एस. तिघलवार, संतोष ठाकरे, बाळासाहेब रनमुले, प्रकाश ढगे, पुष्पा मोहकर, वंदना नाईक व अर्जुन चव्हाण यांची १५ सदस्यीय तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.
अधिवेशन सुरू करण्यापूर्वी अभिवादन रॅली काढून महागावतील चौकात असणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून त्यांचा जयजयकार करीत अभिवादन करण्यात आले. अधिवेशन स्थळी पक्षाचा लाल झेंड्याला सलामी करून गेल्या तीन वर्षात मृत्यूला सामोरे गेलेल्यांना मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या अधिवेशनाचे उदघाटन पक्षाचे जिल्हा सचिव कॉ . कुमार मोहरमपुरी यांनी करून उदघाटनपर वक्त्यव्य केले. यानंतर कॉ. डी. बी. नाईक व कॉ. देविदास मोहकर यांनी अहवाल मांडला. या अहवालावर ७ लोकांनी आपले मत मांडले. यानंतर ५ ठराव पारित करण्यात आले.
त्यानंतर ऍड. दिलीप परचाके यांनी जोशपूर्ण भाषण करीत दैदीप्यमान पक्षाचा इतिहास व पक्षाची शिस्त मांडीत शेतकरी, कामगार व सामान्य जनतेच्या होत असलेल्या ससेहोलपटाला मोदी सरकार कसे कारणीभूत आहे. ते सकारणं पटवून दिले. शेवटी कॉ. दानव यांनी वैचारिक मांडणी करीत जनतेची एकजूट करीत संघर्ष वाढविण्याचे आवाहन केले. यावेळेस आशा स्वयंसेविकाच्या जिल्हा सचिव उषा मुरके यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
यवतमाळ:यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. शासन...
*बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी समाजसेवा व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी महाराष्ट्र प्रेरणा...