Home / महाराष्ट्र / राज्यात आज रात्रीपासून...

महाराष्ट्र

राज्यात आज रात्रीपासून 15 दिवस संचारबंदी; जनतेची सात कोरोनावर मात

राज्यात आज रात्रीपासून 15 दिवस संचारबंदी; जनतेची सात कोरोनावर मात

जनतेची सात कोरोनावर मात

मुंबई(प्रतिनिधी):  राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा संचारबंदी व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची घोषणा केली. ही संचारबंदी 15 दिवसांसाठी असेल व उद्या (बुधवारी) 14 रोजी रात्री 8 पासून त्याची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी 5 हजार 400 कोटींचे आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. 


अत्यावश्यक सेवा वगळताइतर सर्व सेवा बंद राहणार

 सकाळी 7 ते रात्री 8 या काळात अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणार्‍या वर्गाला येण्या-जाण्यासाठी सुरू राहतील.

पावसाळ्याची कामं पावसाळ्या-पूर्वीच करावी लागतात. ती कामं सुरू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना व पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे.


बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी, अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचार्‍यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल.


बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील 25 लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.


हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलिव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचं लसीकरण बंधनकारक असेल.


एक महिना मोफत अन्नधान्य

राज्य सरकार म्हणून अन्नसुरक्षा योजनेंतर्गत 7 कोटी लाभार्थ्यांना पुढचा महिनाभर प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत दिले जातील. 


शिवभोजन थाळी मोफत

शिवभोजन थाळी 10 रुपयात सुरू केली होती. कोविड आल्यानंतर ती 5 रुपये केली. आत्तापर्यंत काही कोटी लोकांनी या थाळीचा लाभ घेतला आहे. आता शिवभोजन थाळी पुढचा एक महिना मोफत दिली जाईल. दिवसाला आपण 2 लाख थाळ्या देत आहोत. गोरगरिबांसाठी हे शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. लॉकडाउननंतर रोजीरोटीचे काय, अशी विचारणा केली जाते. रोजीचे नुकसान होईल, पण रोटीची सोय आपण केली आहे.


सर्व दुर्बल घटकांना दिलासा

महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये अर्थसहाय्य देत आहोत. यांची संख्या 12 लाखांपर्यंत आहे. नोंदणीकृत घरेलू कामगारांना निधी देत आहोत. अधिकृत फेरीवाल्यांना एका वेळचे प्रत्येकी 1500 रुपये आपण देणार आहोत. स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांची बँकांमध्ये खाती असल्यामुळे थेट खात्यांमध्ये पैसे जमा होतील. त्यांची संख्या 5 लाख आहे. 12 लाख परवानाधारक शेतकर्‍यांना 1500 रुपये एकवेळचे आपण देत आहोत. आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून एका वेळचे 2 हजार रुपये देत आहोत.


निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे 35 लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ देण्यात येईल. 


कोविडवरील सुविधा उभारणी

जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा उभी करण्यासाठी 3 हजार 300 कोटी फक्त कोविडसाठी बाजूला काढून ठेवतो आहोत. जिल्हाधिकार्‍यांना थेट स्थानिक पातळीवर निर्णय घेता यावा, यासाठी हे करण्यात आले आहे. साधारणपणे एकूण 400 कोटींच्या या योजना आपण या माध्यमातून करत आहोत.


हे सगळ मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर ठेवले आहे. कुठेही लपवाछपवी नाही. नाइलाजाने ही बंधने टाकावी लागत आहेत. आरोग्यसुविधा तयार करण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ही बंधने आपल्याला स्वीकारावी लागत आहेत. ही बंधने मी एकतर्फी टाकलेली नाहीत. त्यामागे फक्त प्राण वाचावेत हाच हेतू आहे. हे अजिबात आनंददायी नाही. टीका करणारे कितीही असले, तरी त्याला न भुलता आपली जी बांधिलकी आहे, त्याला स्मरून हे निर्बंध तुमच्यावर लादत आहे. त्याचा न रागावता स्वीकार करा आणि कोविडला पराभूत करण्यासाठी कंबर कसून सहकार्य करा.


गेल्या वर्षीही आपण पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा म्हणालो होतो, की पुढचा गुढीपाडवा कोविडमुक्त असू दे. मधल्या काळात तशी परिस्थिती आपण नक्कीच निर्माण केली होती. फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवर नियंत्रण मिळवले होते. जिंकत आलेल्या युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. भयानक पद्धतीने रुग्णवाढ झाली आहे. आजचा आकडा आजपर्यंतचा सर्वात जास्त आहे. 60 हजार 212 रुग्ण राज्यात सापडले आहेत. ही भीतीदायक परिस्थिती आहे.


प्रत्येक गोष्टीची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त भार त्यावर पडला, तर ती यंत्रणा कोलमडून पडते. आज आपल्या चाचण्यांच्या यंत्रणेवर ताण येतोय. राज्यातल्या आरोग्य सुविधांवर भार यायला लागला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. पण आपली सुरू असलेली परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त भार त्यावर पडला, तर ती यंत्रणा कोलमडून पडते. 


आता नुसती चर्चा परवडणारी नाही, नाही तर

आपल्याला आता चर्चा परवडणारी नाही. कारण हा कालावधी आपल्या हातातून गेला, तर आपल्याला कुणी वाचवू शकणार नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळत नाही. रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढली आहे. काही कारखान्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा देखील करायला सुरुवात केली आहे. पण इतर कंपन्यांकडून ऑक्सिजन आपल्या राज्यात आणणे कठीण आहे.


हवाई वाहतुकीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा

राज्यातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मोठी गरज महाराष्ट्राला आहे. राज्यात बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना  मी विनंती करत आहे. हवाई वाहतुकीने ऑक्सिजन आणण्यासाठी वायुदलाला आदेश देऊन आम्हाला मदत करा.


जीएसटी परताव्याला मुदतवाढ द्या

उद्योगधंद्यांना आधार देण्यासाठी जीएसटीच्या परताव्याला 3 महिन्यांची तरी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना करणार आहे. त्याशिवाय, भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्ती जाहीर होतात. कोरोना या नैसर्गिक आपत्तीत इतर आपत्तींप्रमाणेच निकष लावून ज्यांच्या रोजीरोटीवर संकट आले त्यांना वैयक्तिक मदत द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना करतोय.


ब्रिटनने अडीच ते तीन महिने लॉकडाउन लावून जवळपास 50 टक्के जनतेला लसीकरण केले. आत्ताचं तिथलं चित्र म्हणजे रुग्णालयावरचा ताण कमी झाला आहे. मृत्युदर कमी झाला आहे. त्याच मार्गाने आपल्याला जावं लागेल, लसीकरण वाढवावं लागेल. जेणेकरून पुढची लाट आपण थोपवू शकू.


आपण एकदा कोविडवर नियंत्रण मिळवून दाखवलंय. पण यावेळी चित्र वेगळं आहे. आरोग्य सुविधा तोकडी पडताना आपल्याला दिसत आहे. आपण जिद्दीने लढणार आणि जिंकणार आहोत. पण ही रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजनचा वापर जास्त करावा लागतोय. त्यामुळे बेड्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. ती वाढवण्यासाठी आपण शक्य ते सगळं करत आहोत.


निवृत्त झालेल्या डॉक्टर, परिचारिकांना मी आवाहन करतोय, की तुम्ही सगळ्यांनी मदतीला, लढायला पुढे या. सर्व स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांना आवाहन करतो की जे काही तुम्ही करू शकाल आणि जे शक्य आहे ते करण्यासाठी तुम्ही सरकारच्या सोबत या. ही उणीदुणी काढण्याची वेळ आहे. सर्व राजकीय पक्षांना माझं आवाहन आहे. आता उणीदुणी काढत बसलो, तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. पंतप्रधानांनाही मी हीच विनंती केली, की देशातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना आवाहन करा, की राजकारण बाजूला ठेवा. आपण एकसाथ लढायला हवं, तरच आपल्याला या साथीवर नियंत्रण मिळवता येईल.

- सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू.
- कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार. 
- उद्या रात्रीपासून ब्रेक द चेनसाठी राज्यात संचारबंदी. 
- पुढील 15 दिवस संचारबंदी.
- येणे-जाणे पूर्ण बंद.
- आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही.
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद.
- सार्वजनिक वाहतूक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार.
- त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार.
- वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतूक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार.
- शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील.
- बँका, आर्थिक संस्था,  अधिस्वीकृतीधारक पत्रकार, पेट्रोलपंच कामगारांना मुभा.
- बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट.
- हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार.
- रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार.
- लाभार्थीना 3 किलो गहू आणि दोन किलो तांदूळ एक महिना मोफत.
- सात कोटी लोकांना मोफत धान्य.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...