Home / महाराष्ट्र / नव्या वर्षापासून प्रत्येक...

महाराष्ट्र

नव्या वर्षापासून प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक  

नव्या वर्षापासून प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक  

प्रत्येक वाहनाला 1 जानेवारीपासून फास्टटॅग असणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

 

भारतीय वार्ता :   टोलनाक्यांवर सुट्यांच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळांमध्ये होणारी गर्दी हा सार्‍याच भारतीयांच्या सवयीचा भाग झाला आहे. या वेळखाऊ प्रक्रियेवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वाहनांसाठी फास्टटॅग लावणे आणि बंधनकारक करणे याबाबतच्या हालचाली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून सुरू झाल्या होत्या. परंतु, फास्टटॅगची संख्या आणि देशात असलेल्या वाहनधारकांची संख्या पाहता दिलेल्या वेळेत सर्व वाहनांना फास्टटॅग लावणे शक्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे वाहनधारकांना काही दिवसांची मुदत देण्यात आली होती. नव्या वर्षापासून प्रत्येक वाहनाला फास्टटॅग असणं बंधनकारक असणार आहे.ऑनलाईन चलन स्वीकार कार्य हे साध्य करणे व समाजात रुजवणे हे सहज शक्य  होणार त्यासाठी आता फास्टटग. 

         देशातील प्रत्येक वाहनाला 1 जानेवारीपासून फास्टटॅग असणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी ही घोषणा केली. 1 जानेवारी 2021 पासून प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक असणार आहे. फास्टटॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील, असे ते म्हणाले. फास्टटॅग ही संकल्पना 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. चार अधिकृत बँकांनी सुमारे लाखभर वाहनधारकांना फास्टटॅग वितरित केले आहेत. 2017 मध्ये हाच आकडा वाढून सात लाखांपर्यंत गेला आणि 2018 च्या अंती हा आकडा 34 लाखांवर जाऊन पोहोचला. नोव्हेंबर 2020 मध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून 1 जानेवारी 2021 पासून फास्टटॅग बंधनकारक करण्याचे निर्देश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 1 डिसेंबर 2017 च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही फास्टटॅग बंधनकारक असणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, फास्टटॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्या संबंधीचा एक मेसेज त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टटॅगची मुदत पाच वर्षांची असेल. पाच वर्षें पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टटॅग खरेदी करावे लागनार आहे.  

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...