Home / चंद्रपूर - जिल्हा / शेतकरी बांधवांनी बांधावर...

चंद्रपूर - जिल्हा

शेतकरी बांधवांनी बांधावर खत व बियाणे योजनेअंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करावी.

शेतकरी बांधवांनी बांधावर खत व बियाणे योजनेअंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करावी.

शेतकरी बांधवांनी बांधावर खत व बियाणे योजनेअंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करावी.

चंद्रपूर: खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना खते, बियाण्यांच्या खरेदीसाठी गैरसोय होऊ नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये.बियाणे, खताची मागणी  केल्यास शेतकऱ्यांना  बियाणे व खते कृषी निविष्ठा केंद्रामार्फत बांधावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद कृषी विभागाने हाती घेतला आहे. तरी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

              जिल्ह्यात कापूस,सोयाबीन, तूर, भात या महत्त्वाच्या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. कोरोनाच्या संक्रमण काळात शेतीच्या हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व कृषी निविष्ठांची शेतकऱ्यांना उपलब्धता व कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे व रासायनिक खते पुरवठा योजनेअंतर्गत कृषी निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी रासायनिक खते व बियाण्यांची खरेदी आपल्या गावातील शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी तथा कृषी विभाग यंत्रणा यांच्या संयुक्त सहकार्याने केल्यास रास्त किमतीमध्ये उच्च गुणवत्तेचे रासायनिक खते व बियाणे तांत्रिक मार्गदर्शनासह प्राप्त होईल तसेच  वाहतूक खर्चामध्ये देखील बचत होईल व कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.

                चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती, कृषी विस्तार अधिकारी  पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधून तालुकास्तरावरील किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांची मागणी असलेले रासायनिक खत व बी-बियाणे यांचे शेतकरी गट प्रमुख यांच्यावतीने व्यवहार पूर्ण करून संबंधित गावात पुरवठा करून घ्यावा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी बांधावर खत व बियाणे योजनेअंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करावी.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...