Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / शेतकऱ्यांनी सोयाबीनची...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता घरच्या घरी तपासावी, सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन..

शेतकऱ्यांनी  सोयाबीनची उगवण क्षमता घरच्या घरी तपासावी, सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन..
ads images

चंद्रपूर : पुढील महिण्यात होणाऱ्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाची पेरणीपुर्व उगवणक्षमता तपासणे  गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी घरच्या घरी उगवणक्षमता तपासून घ्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वी उगवण क्षमतेची चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेरणी करतेवेळी बियाणेचे
प्रमाण किती ठेवावे याबाबत अंदाज येऊ शकतो. शेतकऱ्यांनी घरच्या घरीच उगवण क्षमतेची चाचणी करावी व चाचणीपूर्वी काळजी घ्यावी. शेतक-यांनी स्वत:कडे असलेले सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे,लहान व खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे.

अशी आहे उगवण क्षमता तपासण्याची प्रक्रिया :

 वर्तमानपत्राचा एक कागद घेवून त्याला चार घडया पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पुर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येक दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी.अशा रीतीने १०० बियांच्या १० गुंडाळया तयार कराव्यात नंतर या गुंडाळया पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या ६० असेल तर उगवण क्षमता ६० टक्के आहे, असे समजावे. जर ती संख्या ८० असेल तर उगवणक्षमता ८० टक्के आहे असे समजावे. अशा पध्दतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो.

सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे ७० टक्के पेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणी साठी प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. शेतकऱ्यांनी स्वतः कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता उपरोक्त पद्धतीने घरच्या घरी तपासून नंतरच अशा बियाण्यांची पेरणी करावी. उगवण क्षमता 70 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास त्याच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. ऊगवण क्षमतेच्या प्रमाणात पेरणीसाठी किती बियाणे लागेल हे काढण्यासाठी 70 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 30 किलो प्रती एकर बियाणे आवश्यक आहे. 69 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 30.5 किलो प्रती एकर, 68 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 31 किलो प्रती एकर,67 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 31.5 किलो प्रती एकर,66 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 32  किलो प्रती एकर,65टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 32.5 किलो प्रती एकर,64 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 33 किलो प्रती एकर, 63टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 33.5 किलो प्रती एकर, 62 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 34 किलो प्रती एकर, 61टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 34.5 किलो प्रती एकर, 60 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 35 किलो प्रती एकर, उगवण क्षमतेनुसार बियाणांची आवश्यकता लागेल.

रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणी पुर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून असे बियाणे सावलीत वाळवावे.पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशी रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी पुरेशी ओलीवर आणि ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी दर ७० किलो वरून ५० ते ५५ किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पध्दतीने किंवा प्लॅटरच्या सहाय्याने रूंद वरंबा सरी पध्दती (बी.बी.एफ) यंत्राने पेरणीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करावे, याप्रमाणे शेतक-यांनी सुचनाचा अवलंब करावा.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...