वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
चंद्रपूर दि.27 जुलै : ड्रॅगनफ्रुट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे. या फळांमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट मुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिध्दी मिळत आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरिक्त या फळांमध्ये फॉस्फरस व कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायम टिकून राहतात. तसेच या पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मुल्ये इत्यादी बाबी लक्षात घेऊन सन 2021-22 या वर्षापासुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातुन ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
ड्रॅगन फ्रुट फळ पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पुर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मी.×3 मी.×2.5 मी. या अंतरावर खड्डे खोदुन खड्ड्याच्या मधोमध सिमेंट कॉंक्रिटचा किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर काँक्रिटची फ्रेम बसविण्यात यावी. सदर सिमेंट काँक्रेट खांबाच्या एका बाजुला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.
ड्रॅगन फ्रुट फळ पिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण या बाबीकरीता अनुदान देय आहे. याकरीता रक्कम रु. 4 लाख प्रकल्पमुल्य ग्राहय धरुन 40 टक्के प्रमाणे रक्कम रु. 1.60 लाख अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे.
तरी, ड्रॅगन फ्रुट फळ पिकाच्या लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...