आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
मारोती माने (लातूर जिल्हा प्रतिनिधी): केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात तीन काळे कायदे तयार केले आहे. या कायदयामुळे उद्योगपती व भांडवलदाराना फायदा होणार आहे. त्या काळ्या कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतातील शेतकरी समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून जनआक्रोश प्रदर्शन करीत आहे. दि.03 जुन 2020 रोजी केंद्र सरकारने संसदेत शेतकरी बील मांडले आणि दि.05 जून2020 रोजी ते बिल अवाजी मताने मंजुरही करून घेतले आहे. हे बिल काँग्रेस पक्षाच्या सहमतीने मंजुर करण्यात आले आहे. परंतु हे दोनही सरकार तु कर मारल्यावानी मी करतो रडल्यावानी असा खेळ यांनी सुरू ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार, व सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. तरी ही सरकारला जाग येत नाही. भारताची राजधानी दिल्लीच्या चार ही बॉर्डरवर राष्ट्रीय किसान समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रव्यापी किसानआंदोलन दि.15 ऑगस्ट2020 रोजी पासुन आजपर्यंत लढा देत आहे. त्या आंदोलनाला एक वर्षे पूर्ण झाले आहे. परंतु केंद्र सरकार तीन काळे कायदे वापस घेण्यास तयार नाही. केंद्र सरकारने तीन काळे कायदे वापस घेतले तर शेतकऱ्यापुढे सरकार झुकले असा मेसेज लोकांत पर्यंत जाईल म्हणून केंद्र सरकार आडून बसले आहे. किसान ही आपलेआंदोलन मागे घेण्यास तयार नाही. सरकार जर जनतेच्या कल्याणासाठी काम करीत आहे. तर सरकारने जनतेचे गऱ्हाणे ऐकलेच पाहिजे. असे शेतकऱ्यांना वाटत आहे. वर्तमान सरकार भांडवलदरांचे उद्योगपतीचे ,भले करणारे सरकार आहे. म्हणुन जनतेचा छळ होताना दिसत आहे. हा प्रकार थांबला नाही. तर देशात प्रतीक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. सरकार आडेलतटटूची भूमिका घेत असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरून जनआंदोलन करून आमचे न्याय हक्क मिळविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. तीन काळे कायदे मागे घेतलेच पाहिजे.जनतेच्या हिताचे कायदे बनले पाहिजे. खाजगीकरण, जागतीकीकरण, उदरीकरण रोखलेच पाहिजे. असे शेतकरी, कामगाराचे म्हणणे आहे.
आज दि.16 ऑगस्ट2021 रोजी लातूर येथील छत्रपती शाहु चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राष्ट्रीय किसान मोर्चा लातूरच्या वतीने रॅलीचे अयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसुरेश वर्मा, व राष्ट्रीय संरक्षक तथा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक मान्य. वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या 550 जिल्हयात एकाच दिवशी हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय किसान मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष किशोर फुलाने, यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहु महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या जनआक्रोश पायदळ रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई मार्गे, बसस्थानक,गांधी चौक, महात्मा जोतीराव फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून व सर्व महापुरूषांना अभिवादन करून जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य प्रभारी बालाजी कांबळे, बामसेफचे व्ही.व्ही. जाधव साहेब, मोर्य क्रांती संघाचे राज्यध्यक्ष चंद्रसेन लहाडेसर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष दिपक इंगळे , शिवलिंगबिराजदार,उपस्थित होते. या ठिकाणी वरील मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. त्यानंतर लातूरचे अप्पर जिल्हाधिकारी याच्या मार्फत मोर्चाचे निवेदन देऊन महामहिम राष्ट्रपती महोदयांना कळविण्यात आले.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक मारोती माने, सनी बनसोडे, बंडू ठाकूर, दत्ता करंजीकर, एजाज तांबोळी, डॉ.मधुकर कांबळे, रवी माणसे, राजेंद्र भदाडे, चंद्रकांत कांबळे.आश्विन कुमार गुजरगे,बरगे सर, कोंडेकर, डॉ. जमील आत्तार, डॉ. सतीश ननीर, दिपक कांबळे, कोकणे मामा, रामभाऊ गिलचे, वामनराव काळे, धनाजी उजळंबकर, अरविद नाईकवाडे ,धमानंद कांबळे,प्रा. दत्ता शिंदे, यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचलन सनी बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मारोती माने यांनी केले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...