वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
पैशासाठी शेतकर्यास मारहाण, एकास अटक तर दोन पसार पोलीसाचा कसून शोध सुरू
वणी: कापुस विकुन गावाकडे परत जात असलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाला थांबवून पैसे हिसकावून मारहाण केल्याची घटना वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिरपूर मार्गावरील निलगिरी बन जवळ घडली असुन यातील एका आरोपीस अटक करण्यात आली तर दोन आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.विशेष म्हणजे या घटनेतील आरोपींनी फुलथापा देऊन शेतकरी मुलांना मारहाण करून लुटमार केले आहे.
सविस्तर वूर्तअसे की,तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथिल शेतकरी पुत्र उमेश बंडू विधाते (२३)यांनी कापुस विक्री करीता नेण्यासाठी छोटा हत्ती वाहन क्र.एम एच-३४ एबी-३१०५ ने कापुस भरुन वणीला आनले यावेळी त्याच्यासोबत त्याचा भाऊ व मित्र होते.त्यांनी येथिल निळापुर ब्राम्हणी मार्गावरील एका जिनींगमध्ये कापसाची विक्री केली त्यानंतर दलालाकडुन कापसाचा चुकारा घेऊन दिपक चौपाटीवर आले. चौपाटीवर आल्यानंतर त्यांनी काही सामानांची खरेदी केली व नाश्ता केला छोटा हत्ती या वाहनाने वणी- शिरपूर मार्गे आपल्या गावाकडे निघाले असता वाघदरा बस थांब्याजवळील एका बियर बार समोर उभे असलेल्या तिन जनांपैकी एकाने हात दाखवून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु यांनी वाहन न थांबता सरळ निघून गेले असता त्या तिघांनी एका मोपेड वाहनाने शेतकऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग करुन निलगिरी बनाजवळ थांबले व आम्ही पोलिस असून तुम्ही एका इसमाच्या पायावरून वाहन नेले आहे.त्या इसमाच्या पायाला दुखापत झाल्याने नुकसान भरपाई म्हणून २००० रुपयेची मागणी केली.परंतु या शेतकरी मुलांच्या लक्षात आले की हे पोलिस नसुन भामटे आहे.त्यामुळे आधि त्यांना पाचशे रुपये दिले.परंतु भामटे असलेले पोलिस थोडेही पाचशे रुपये घेणार! त्यांनी धमकावले असता या शेतकरी मुलांनी या भामट्यांच्या हातुन लवकर सुटका व्हावी म्हणून दोन हजार रुपये दिले.परंतु पैसे देतांनी त्यांच्या जवळील कापसाची मिळालेली रक्कम त्यांनी पाहुन घेतली व मारहाण करून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला यात एकाचे ३० हजार रुपये व पाच हजार किमतीचा मोबाईल हिसकावले व सीम काढुन फेकुन दिला हि झटापट सुरू असतांना रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना मदतीकरीता थाबवले असता दोन भामटे पळाले तर एका आरोपीला निकेश अशोक पेत्र यास पकडुन वणी पोलिसांच्या ताब्यात देवून अटक केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी निकेश अशोक पेंदोर,रामा देठे व तिसरा अनोळखी या तिघां विरुद्ध भादंवी कलम ३९४,४१९ अन्वये गुन्हा नोंद करून पसार असलेल्या दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.पुढील तपास वैभव जाधव याच्या मार्गदर्शन खाली सुरू आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...