Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गडचांदूर येथे शेतकरी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गडचांदूर येथे शेतकरी युवा आघाडीचे प्रशिक्षण शिबीर..!

गडचांदूर येथे शेतकरी युवा आघाडीचे प्रशिक्षण शिबीर..!

ॲड. वामनराव चटप व ललित बहाळे यांचे होणार मार्गदर्शन

जिवती (सय्यद शब्बीर जागीरदार) :  चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या सहयोगाने शेतकरी युवा आघाडीच्या वतीने दिनांक ५ व ६ जानेवारी २०२२ ला कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गडचांदूर येथील बालाजी सेलीब्रेशन हॉल  येथे होणार्‍या या द्विदिवशीय शिबीराला शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून हे शिबीर होणार असून यात शेतकरी संघटनेचे विचार व कार्यपद्धती, युगात्मा शरद जोशी यांचे योगदान, बाजारपेठ, तंत्रज्ञान यांचे स्वातंत्र्य व स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी विरोधी कायदे, संघटनेची बांधणी, युवकांपुढील आव्हाने, वेगळा विदर्भ कां ? यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

 ५ जानेवारी ला दुपारी शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थान जेष्ठ शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप भूषविणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी स्वभापचे प्रांताध्यक्ष मधुकर हरणे, माजी प्रांताध्यक्ष दिनेश शर्मा, गुणवंत पाटील हंगरगेकर, सुधीर बिंदू, सतीश दाणी, जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दररोज तीन सत्र होणार असून प्रत्येक विषयाची सविस्तर मांडणी केली जाणार आहे. या शिबिरात ॲड.श्रीनिवास मुसळे, ॲड.दिपक चटप व रत्नाकर चटप हे शेतकरी युवकांच्या समस्या व संघटनात्मक बांधणीचे पैलू या विषयी आपले विचार मांडून अनुभव कथन करणार आहेत. यानिमित्ताने युवकांच्या समस्या व प्रश्नांविषयी सविस्तर उहापोह होणार आहे.

या शिबिरात युवकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन शेतकरी महिला आघाडीच्या पौर्णिमा निरंजने, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, संघटनेचे डॉ.संजय लोहे, अविनाश मुसळे, संतोष पटकोटवार, निळकंठ कोरांगे, दिनकर डोहे, प्रविण एकरे, रमजान अली, प्रा.निळकंठ गौरकर, पंढरीनाथ बोंडे, मदन सातपुते, बंडू पाटील राजुरकर, प्रविण सावकार गुंडावार, विलास धांडे, संध्या सोयाम, नगरसेविका रजिया बेगम शेख ख्वाजा, शेतकरी युवा आघाडीचे ॲड.दीपक चटप, संतोष पटकोटवार, श्रीकांत घोरपडे, नरेश सातपुते, सुनील मडावी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या युवा व महिला आघाडीने केले आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...