Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्ह्यातील भात पिकाचे...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन व निर्यात वाढविण्यासाठी निर्यातदारांनी प्रयत्नशील राहावे  - जिल्हाधिकारी गुल्हाने

जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन व निर्यात वाढविण्यासाठी निर्यातदारांनी प्रयत्नशील राहावे  - जिल्हाधिकारी गुल्हाने

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राद्वारे निर्यातदारांचे संमेलन

चंद्रपूर दि. 24 सप्टेंबर : चंद्रपूर हा भात उत्पादक जिल्हा आहे. शासनाच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन व त्याची निर्यात वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्हयात निर्यात प्रचलन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील भाताचे उत्पादन व निर्यात वाढविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एन.डी. हॉटेलमध्ये आयोजित निर्यातदारांच्या संमेलनाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास केंद्राचे सहाय्यक संचालक वाय.सी. बघेल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने भारत सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम सुरू केला आहे. या महोत्सवाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील उद्योजक, राईस मिल ऑनर व उद्योगपती यांचा सहभाग निर्यातीमध्ये जास्तीत जास्त वाढावा त्यासाठी निर्यातदाराचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट 2021 पासून ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत आणि त्यानंतर देखील देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची उजळणी व्हावी व एकंदरीत भारताचे सांस्कृतिक वैभव सर्वांसमोर आणण्याकरीता हा महोत्सव सुरू केला आहे. यामध्ये उद्योगपतींचा, संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. 

देशातील निर्यातदारांचा सहभाग वाढविण्याकरीता केंद्र शासन वेगवेगळ्या योजना राबवित असते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, आंतरराष्ट्रीय व्यापारात देशाचा वाटा किती, यावरून देशाची आर्थिक परिस्थिती अवंलबून असते. त्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्याने उत्पादीत केलेला माल निर्यात केला तर देशाचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल. केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत ज्यामध्ये निर्यातदारांना प्रोत्साहित करून वेगवेगळ्या यंत्रणांसोबत समन्वय साधता येतो.  या समन्वयातून आपल्या जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावता येईल, हा या अमृत महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

यावेळी सूक्ष्म व लघु मध्यम उद्योगाचे सहाय्यक संचालक श्री. बघेल म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात तांदळाचे उत्पन्न अधिक असून त्याचे उत्पादन वाढवून निर्यात देखील वाढवता येऊ शकते. यासाठी जागा खरेदी पासून तर माल निर्यात करण्यापर्यंत सूक्ष्म व लघु, मध्यम विभाग निर्यातदारांना मदत करेल. याचा जास्तीत-जास्त फायदा जिल्ह्यातील निर्यातदारांनी घ्यावा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी केले. कार्यक्रमाला उद्योजक, विविध उद्योगांचे प्रतिनिधी तसेच बँकर्स उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...