Home / चंद्रपूर - जिल्हा / फिरत्या मोबाईल रुग्णालयाद्वारे...

चंद्रपूर - जिल्हा

फिरत्या मोबाईल रुग्णालयाद्वारे आठवडाभरात 1400 रुग्णांची तपासणी

फिरत्या मोबाईल रुग्णालयाद्वारे आठवडाभरात 1400 रुग्णांची तपासणी

पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून नागरिकांना घरपोच आरोग्य सुविधा

चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारामुळे आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने तीन फिरते मोबाईल रुग्णालय नागरीकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. आठवडाभरात या फिरत्या मोबाईल रुग्णालयाद्वारे 1403 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यात ब्रम्हपूरी तालुक्यातील 552 नागरीक, सिंदेवाही तालुक्यातील 488 आणि सावली तालुक्यात 363 नागरिकांचा समावेश आहे.

ब्रम्हपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज फिरत्या रुग्णालयाचे (मोबाइल क्लिनीक व्हॅन) पालकमंत्र्यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले होते. दुस-या दिवसापासून सदर तीनही फिरत्या रुग्णालयाद्वारे गावागावात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आठवडाभरात 14 गावांमध्ये 1403 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यात ब्रम्हपूरी तालुक्यातील एकूण 552 जणांचा समावेश असून  किराडी येथील 122 नागरिकांची तपासणी, चिकटबोर्डा येथील 88 जण, एकारा येथील 122, सेलदा येथील 29, मुरपार येथील 75 आणि सायगाव तुकूम येथील 116 जणांची तपासणी करण्यात आली. सिंदेवाही तालुक्यातील पवनचक येथील 82, पवनपार येथील 107, गुंजेवाही येथील 95, कोठा येथील 101, तांबेगाढी – मेंढा येथील 103 असे एकूण 488 तर सावली तालुक्यातील करोडा येथील 50, कोंदेकाल येथील 92, पेढगाव येथील 59, आरोली येथील 72 आणि जाम येथील 90 असे एकूण 363 जणांनी तपासणी करण्यात आली.  

फिरत्या मोबाईल व्हॅनमध्ये एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर उपस्थित असून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखणे, मधूमेह व रक्तदाब तपासणी तसेच ॲन्टीजन तपासणी केली जाते.

मोबाइल ट्रेकिंग सिस्टीम व ॲपचीही सुविधा:

आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हीसेस मार्फत या फिरत्या दवाखान्यामध्ये मोबाइल ट्रेकिंग सिस्टीम व ॲपचीही सुविधा विकसित करण्यात आली आहे. या सिस्टीममध्ये व्हॅनमधील स्वच्छतेसह दररोज होणाऱ्या तपासण्याचा तपशिल, व्हॅन किती किलोमीटर फिरते याचा तपशिल आहे. डॉक्टर-पेशन्ट ॲप हे देखील रुग्णांच्या उपयोगी पडणारे ॲप असून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर रुग्णांची सर्व माहिती भरल्यास सदर माहिती डॉक्टरांच्या मोबाइलवर जाते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...