वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा दीन, दलीत, शोषीत, पिडीत व्यक्तीसाठी काम करणारा असला पाहीजे व त्याच्यामध्ये सेवा व समर्पण हा भाव नेहमी असला पाहीजे असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त दिनांक १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोंबर पर्यंत भाजपा चंद्रपूरतर्फे सेवा समर्पण अभियान राबविण्यात आले. या दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आयएमए सभागृह येथे आयोजित या स्पर्धांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात आ. मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की मा. मोदीजींनी देशातील गरीब लोकांसाठी वेगवेगळया योजना गेल्या सात वर्षात सुरू केल्या व यशस्वीपणे राबविल्या. यामध्ये जनधन योजना, उज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजना, शौचालय योजना, शेतक-यांसाठी आत्मसन्मान योजना या व अशा अनेक योजनांचा समावेश आहे. या सर्व योजना सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचविण्याचे कार्य भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय आत्मीयतेने करावे असेही प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी केले.
या काळात चित्रकला, निबंध, डान्स, गौरव विशेष प्रदर्शनी, गीत गायन स्पर्धा, मॅरॉथन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अ गटात (प्रथम पुरस्कार) कु.पलक गंगाधर माणुसमारे, (द्वितीय पुरस्कार) कु.ऋतुजा गजानन वैरागडे, (तुतीय पुरस्कार) विशाल अनिल सोनटक्के यांनी प्राप्त केला आहे.तर ब गटात, प्रथम पुरस्कार सत्यवान अशोक आत्राम, द्वितीय पुरस्कार मोहम्मद जीलानी, तृतीय पुरस्कार रोशन सुरेश भोयर, यांनी मिळविला. चित्रकला स्पर्धेत अ गटसाठी प्रथम पुरस्कार राहिली चंद्रशेखर बारापत्रे, द्वितीय पुरस्कार पारस रवींद्र वनसिंगे, तृतीय पुरस्कार स्वरा विलास कात्रोजवार,यांनी तर ब गटासाठी प्रथम पुरस्कार अथर्व एस. बारापात्रे, द्वितीय पुरस्कार यश मिलिंद सहारे, तृतीय पुरस्कार प्रशांत वि दुर्गे, यांना जाहीर करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, मनपा गटनेत्या जयश्री जुमडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, बल्लारपूर नगर परिषद अध्यक्ष हरीश शर्मा, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजयुमो ग्रामीण अध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, संजय गजपूरे, नागराज गेडाम, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर, प्रिती भूषणवार, मंजुषा हलकारे, मिथीलेश पांडे, रामकुमार आकापेल्लीवार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रमोद कडू, ब्रिजभूषण पाझारे यांचे समयोचित मार्गदर्शन झाले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...