Home / विदर्भ / अकोला / परिवर्तन स्वाभिमानी...

विदर्भ    |    अकोला

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेची स्थापना..!

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेची स्थापना..!

अकोला (प्रतिनिधी):-  सामाजिक व राजकीय अस्तित्वाच्या स्वाभिमानी लढाईसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मी स्वाभिमानी सामाजिक संघटना या संघटनेची स्थापना दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी समस्त भारतीयांच्या उद्धारासाठी भारतीय संविधान भारतीय संसदेत समर्पित केले होते. आजही भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतात.या दिवसाचे औचित्य साधून आम्ही संविधान पद्धतीने काम करण्याचे मनाशी ठरविले आहे. त्यामुळे ह्या दिवशी आम्ही परिवर्तन स्वाभिमानी संघटना या संघटनेचे उभारणी करीत आहोत.

आजचा तरुण आपल्या राजकीय नेत्याच्या मागे फिरून पूर्णपणे बर्बाद होत आहे. आमचा नेता लय पावरफुल या शब्दानुसार नेता आमदार वरून खासदार, मंत्री अशा मोठ मोठ्या पदावर विराजमान होत आहे व लाखो करोडो रुपयांची संपत्ती कमवत आहे. व कार्यकर्ता हा तिथेच आहे. त्याच्या घरी सोय सुद्धा होत नसून हा तरुण त्या नेत्याच्या नावाचा जय जयकार करत फिरतो म्हणून परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच म्हणणे आहे की, दुसऱ्याच्या मागे फिरून त्यांना मोठे करण्यापेक्षा परिवर्तन स्वाभिमानी संघटनेत सामील व्हा व स्वतः मोठे व्हा असे परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश इंगळे यांनी सांगितले आहे परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी. यामध्ये पुढील कमिटी या प्रमाणे असेल.
१)उमेश इंगळे अकोला महाराष्ट्र अध्यक्ष/ संघटना प्रमुख)
२) पॅथर नरेशभाऊ पटले कल्याण मुंबई (महाराष्ट्र कार्याध्यक्ष)
३) मनोज भाऊ ठाकरे अमरावती ( महाराष्ट्र संघटक)
४) सतिश भाऊ तेलगोटे अकोला (महाराष्ट्र सचिव)
५) शुभम भाऊ तिडके बाळापुर (महाराष्ट्र सरचिटणीस)
६) सुबोध गवई लोणाग्रा (महाराष्ट्र सदस्य) 
 अमोल जगताप. ( संघटना मार्गदर्शक )

हे पदाधिकारी कोअर कमिटी मध्ये काम करतिल संघटना महाराष्ट्र राज्य भर काम करणार असुन  परिवर्तन स्वाभिमानी सामाजिक संघटना चे कार्य उद्देश

१) सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणे.
२) आरोग्य विषयक समस्या सोडविणे.
३) युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
४) तरुणांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करणे.
५) शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांन पर्यत पोहचविणे.
६) गोरगरिबांच्या समस्या शासन दरबारी मांडुन सोडविण्यासाठी प्रयत्न करणे व मदत करणे.
७) पोलीस स्टेशन मधील समस्या संदर्भात मदत व योग्य मार्गदर्शन करणे.
८) विविध शिबीराचे आयोजन करणे.
९) समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांना त्यांच्या अधीकारांची माहीती देणे.
१०) सामाजिक व राजकीय अस्तित्वाची स्वाभिमानी लढाई असुन आपल्याला आपल अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नविन व्यासपीठ आहे.
संघटना वरिल सामाजिक कार्याला जास्त महत्त्व देऊन काम करेल संघटना महाराष्ट्र राज्य भर कार्यरत असुन यामध्ये 
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निलेश गवई मुंबई यांची तर महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा.पजांबराव सिरसाठ पुणे तर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून संगिता ताई सांवत पुणे यांची निवड करण्यात आली आहे या सोबतच विविध जिल्ह्यांत जिल्हा अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. यामध्ये *अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रशांत चक्रणारायण , अमरावती महिला जिल्हा अध्यक्ष कांचन ताई अंबुलकर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शुभम खरे,जालना जिल्हा अध्यक्ष राजिव बकाल औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष जयदिप साबळे, नागपुर जिल्हा अध्यक्ष आकाश पार्शिवे,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कृष्णात कांबळे सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप कांबळे
कोल्हापूर महिला जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री ताई नाईक, सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैभव थोरे,
धुळे जिल्हा अध्यक्ष सचिन ठाकुर, जळगांव महिला जिल्हा अध्यक्ष सुनिता ताई कसबे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष कीशोर गेडाम ,परभणी जिल्हा अध्यक्ष संतोष घुगे, आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे संघटनेची सामाजिक व राजकीय वाटचाल राहणार असुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विचारात घेऊन आगामी महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे सामाजिक व राजकीय अस्तित्वाची स्वाभिमानी लढाई म्हणजे  परिवर्तन स्वाभिमानी संघटना एक नविन व्यासपीठ तरुणांना उपलब्ध करून देत आहोत स्वतः च अस्तित्व निर्माण करुन सिद्ध करण्यासाठी परिवर्तन स्वाभिमानी संघटना मध्ये सामील व्हा असे आवाहन संघनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी सतिश भाऊ तेलगोटे अकोला (महाराष्ट्र सचिव)
सतिश भाऊ तेलगोटे (महाराष्ट्र महासचिव) शुभम भाऊ तिडके बाळापुर (महाराष्ट्र सरचिटणीस)
सुबोध गवई लोणाग्रा महाराष्ट्र सदस्य) आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...