Home / चंद्रपूर - जिल्हा / तृतीय पंथीयांच्या समस्या...

चंद्रपूर - जिल्हा

तृतीय पंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना

तृतीय पंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना

तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्था व्यक्तींनी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 22 जुलै : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

सदर समितीमध्ये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेली सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती तसेच तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत  संस्थेतील 2 तृतीयपंथीय व्यक्तिंचा ( त्यापैकी किमान एक व्यक्ती ट्रान्सवुमन असणे आवश्यक) चा समावेश आहे. त्यामुळे तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही आहेत समितीची उद्दिष्टे : तृतीयपंथीयांच्या तक्रारीचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे.

असे आहे समितीचे कार्य : प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे, जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे विहित कालावधीत निवारण करणे, तक्रारीबाबत पडताळणी करून आवश्‍यकतेनुसार विभागीय तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळास शिफारस करणे तसेच समितीने तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या अडचणींचा, समस्यांचा व तक्रारींचा सखोल अभ्यास करणे व योग्य त्या उपाययोजना शासनास सुचविणे आदी बाबींवर समिती कार्य करणार आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...