Home / चंद्रपूर - जिल्हा / सोमवारपासून अत्यावश्यक...

चंद्रपूर - जिल्हा

सोमवारपासून अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत..

सोमवारपासून अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत..

निर्बंधामध्ये शिथिलता

चंद्रपूर दि. 4 जून :  राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात कमी होत असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यात कडक/प्रतिबंधात्मक निर्बंधास काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार दि. 7 जूनपासून अत्यावश्यक तसेच बिगर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा तसेच बिगर अत्यावश्यक (वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत सेवा वगळून)  सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत कोविड विषयक वर्तणुक नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरु ठेवण्यास परवानगी राहील. संपूर्ण जिल्हयातील अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची एकल दुकाने/आस्थापना (मॉल्स/शॉपींग कॉम्प्लेक्स/सुपर बाजार/सलुन/स्पा/जिम इत्यादी वगळून) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. सदर एकल दुकाने/आस्थापना शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी संपुर्णत: बंद ठेवण्यात यावी.

जिल्हयातंर्गत अत्यावश्यक सेवा/वस्तु तसेच अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर प्रकारची सेवा/वस्तु ई-कामर्सच्या माध्यमातुन सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत वितरीत करण्यास परवानगी राहील. नागरीकांना दुपारी 3 या वेळेनंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणी प्रसंग तसेच घरपोच सेवा या कारणांशिवाय बाहेर येण्या-जाण्यावर निबंध असतील. राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. तथापी कोविड-19 संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या बाबतीत अधिक उपस्थितीकरीता संबंधित कार्यालय प्रमुख यांनी स्थानिक आपत्ती प्राधिकरणाची परवानगी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.

चंद्रपूर जिल्हयांतर्गत दुकाने/आस्थापना यांना पुरवठा केल्या जाणा-या वस्तुंच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बध असणार नाहीत. मात्र दुकानदारांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास अशी दुकाने/आस्थापना कोरोना साथ संपेपर्यंतच्या कालावधीकरीता बंद ठेवण्यात येईल तसेच यापुर्वीच्या आदेशातील नमुद तरतुदीनुसार दंडसुध्दा आकारण्यात येईल,

या आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेश संपुर्ण चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात दिनांक 7 जून च्या सकाळी 7 वाजेपासून 15 जून 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागु राहतील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमुद आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...