वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
तरुण बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याकरिता उपोषणाला सुरवात
आशिष साबरे : तालुक्यातील सुशिक्षित व प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना आरसीसीपीएल सिमेंट कंपनी व बी एस इस्पात कोळसा खदान मध्ये रोजगाराला मुकावे लागले याकरिता नौकरी देण्यात यावी अशी मागणी घेऊन मुकुटबन येथील बसस्थानक जवळ तरुणांनी दोन्ही कंपनी विरुद्ध एल्गार पुकारून 2 ऑगस्ट पासून उपोषणास सुरवात केली आहे.
नियमाने कंपणीला 80 टक्के नौकर भरती स्थानीक तरुणांना देणे बंधनकारक असतांना कंपनीत बाहेर राज्यातील लोकांना नौकरी देण्यात येत आहे व स्थानिक तरुणांना डिग्री ,डिप्लोमा ,प्रशिक्षण व शिक्षण नाही असे म्हणत नौकरी दिल्या जात नाही. दोन्ही कंपनीत काही राजकीय व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नातेवाईकांचा भरणा मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी करण्यात आला मग बेरोजगार तरुणांकरिता का नौकरी नाही असा संतप्त प्रश्न बेरोजगार तरुण युवक करीत आहे. कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या लोकांचे नातेवाईक चांगल्या पोस्टवर काम करीत आहे तर तालुक्यातील सुशिक्षीत व प्रकल्पग्रस्त तरुण बेकार फिरत आहे. कंपणीच्या अडेलट्टू व मुजोर धोरणामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नसून बाहेर राज्यातील लोकांना कामावर ठेवले जात आहे. दोन्ही कंपनीच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध तालुक्यातील 100 ते 150 तरुणांनी एल्गार पुकारला आहे व आमरण उपोषणाला सुरवात केली आहे व जोपर्यंत 288 तरुणांना रोजगार देणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे भूमिका घेण्यात आली आहे.
बी एस इस्पात कोळसा खानमधील आधीकाऱ्याने तरुणांना कामावर घेतो असे म्हणत अनेक तरुणांची ड्रायवर ट्रायल घेतली. परंतु 6 महिने लोटूनही त्या तरूणांना कामावर घेतले नाही. तरुणांच्या भावनेशी खेळत नौकरिवर घेतले व त्यांची फसवणुक केली तरुण युवकाविरुद्ध विविध भध्या करून बदनाम करण्याचे षडयंत्र सुद्धा करीत आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याविरुद्ध प्रचंड संताप तरुण युवकात आहे.
उपोषणाची माहिती मिळताच सदर अधिकारी घाबरून सुट्टीवर निघून गेल्याची माहिती आहे. खाजगी कंपनीच्या विरोधात आंदोलन उपोषण किंवा निवेदन दिल्यास कंपनीतील अधिकारी त्या तरुणांना कोणतेही कारण दाखवून नौकरी देत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो तरुण एकत्र येऊन उपोषण सुरू केले आहे व तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना कम्पनी मध्ये घ्या. अकुशल युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करून त्यांना त्याच कँपनी मध्ये रोजगार उपलब्ध करून द्या, सर्व कामगाराचा विमा काढा, 3 जानेवारी ला झालेल्या घटनेतील युवकांवर कंपणीत रोजगार उपलब्ध करून द्या अशी मागणी उपोषण उपोषण करत्यांनी केली आहे. उपोषणाची सुरवात होताच तालुक्यातील शेकडो तरुणासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या सोबत सरपंच निलेश येल्टीवार, राहुल दांडेकर हरिदास गुर्जलवार यांनी भेट देऊन तरुणांच्या समस्या जाणून घेतल्या तर मुकुटबन ग्रामपंचायत सरपंच मीना आरमुरवार सदस्य बबिता मुदमवार सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे,संतोष बरडे सह व्यापारी ,शिक्षक व विविध पक्षाचे अध्यक्ष यांनी भेटी दिल्या व शिवक्रांती कामगार संघटना व विविध संघटनेनी व पत्रकार बंधूनी पाठिंबा दिला आहे. तरुणांना न्याय मिळण्याकरिता सर्वच राजकीय पुढारी व लोकप्रनिधी उपोषणाला पाठिंबा देणार असल्याचे माहिती आहे त्यामुळे तरुणांच्या उपोषणाला यश नक्की मिळणार नाही तर उपोषण अधिक तीव्र स्वरूपाचे होणार असल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे. उपोषण करिता आझाद उर्फ गजानन उदकवार, पंढरी धांडे, सुनील जींनावार ,उमेश पोतराजे , अनुप दगडी बसले आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...