Home / चंद्रपूर - जिल्हा / ना.विजय वडेट्टीवार...

चंद्रपूर - जिल्हा

ना.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सिमेंट उद्योगातील कामगारांच्या किमान नवीन वेतनश्रेणीतील त्रुटी होणार दूर

ना.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सिमेंट उद्योगातील कामगारांच्या किमान नवीन वेतनश्रेणीतील त्रुटी होणार दूर

सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील किमान वेतन पध्दतीमध्ये बदल करण्यासाठी समिती  होणार गठित

चंद्रपूर/मुंबई, दि. 17 नोव्हेंबर: सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योग यातील कामगारांना अल्प वेतन मिळत आहे, त्यामुळे किमान वेतनातील त्रुटी दूर करून  सिमेंट उद्योगातील कामगारांना 21 हजार रूपये किमान वेतन वाढ देण्यात यावी. अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत केली. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिमेंट कामगारांना किमान वेतन लागू करण्यासाठी सिमेंट उद्योगातील कामगारांसाठी समिती गठित करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत दिले.

मंत्रालयातील कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतनामध्ये दुरूस्ती करून किमान वेतन श्रेणी लागू करण्यासाठी ही बैठक पार पडली.यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कामगार विभागाच्या प्रधानसचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, सहसचिव एस.एम.साठे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांचे किमान वेतन वाढ करणे आवश्यक आहे चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, एसीसी सिमेंट, अंबूजा सिमेंट,दालमिया सिमेंट हे पाच सिमेंट उद्योग असून यामध्ये किमान 15 ते 20 हजार कामगार काम करीत आहे.

सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू आहे.या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत असल्याची बाब विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेने  जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योग हा या दोन वेगळ्या बाबी असून सिमेंटवर आधारित कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी यावेळी केली. यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी आतापर्यंत विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन सादर केलेली आहेत. या बैठकीला विजय ठाकरे, दशरथ राऊत व इतर सदस्य या बैठकीला उपस्थित होते.

सिमेंट वर आधारित उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनासाठी समिती गठित करणार :- कामगार मंत्री हसन मुश्रीफ

सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना किमान वेतन मिळावे तसेच कामगारांना किमान वेतन असावे यासाठी समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल.सध्या कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत आहे.त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.सिमेंट उद्योगातील ठेका श्रमीकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतन वाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी  बैठकीत दिले

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...