Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / वडकी येथील प्रसिद्ध...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

वडकी येथील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ सुरेंद्र ठमके यांची वर्धा नदीत उडी मारून आत्महत्या

वडकी येथील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ सुरेंद्र ठमके यांची वर्धा नदीत उडी मारून आत्महत्या
ads images

डॉ ठमके यांच्या आपत्कालीन आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली, आत्महत्या का केली? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी): तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग -७ वर असलेल्या अत्यंत महत्वाच्या वडकी शहरातील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ सुरेंद्र ठमके (५३) यांनी आज दिनांक २९ ऑगस्ट रोज रविवारी दुपारी १२ वाजता वर्धा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. डॉ ठमके यांनी आत्महत्या का केली? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे. वृत्तलीहीस्तोवर आत्महत्येचे कारण कळले नव्हते.

वर्धा नदीच्या पुलाजवळ डॉ ठमके यांची टूव्हीलर गाडी व त्यांच्या चपला लोकांना आढळून आल्या असता त्यांना डॉ ठमके यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असा संशय आल्यामुळे त्यांनी नदीच्या पत्रात उतरून चौकशी केली असता वर्धा नदीच्या पुलापासून २ किलो मीटर अंतरावर वर्धा नदीच्या पात्रात डॉ ठमके यांचा मृतदेह आढळून आला. काही नागरिकांनी ही बातमी तात्काळ पोलीस स्टेशन वडकी यांना तसेच परिसरातील जनतेला कळविली. डॉ ठमके यांच्या आपत्कालीन आत्महत्येमुळे त्यांच्या परिवारावर तसेच संपूर्ण वडकी परिसरातील जनतेवर आणि वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. डॉ ठमके यांचा वडकी येथे खैरी रोडवर दवाखाना आहे त्या दवाखान्यात ते प्रॅक्टिस करत असायचे.

मिळालेल्या माहितीनुसार ते एक उत्कृष्ठ असे जनरल फिजिशियन आणि चांगल्या व्यक्तिमह्त्वाचे धनी होते. त्यांनी परिसरातील कित्येक रुग्णांना आपल्या वैद्यकीय कोशल्यामुळे बरे केले. त्यांच्या अशा आपत्कालीन आत्महत्येमुळे एक वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट दर्जाच्या व्यक्तिमत्वाचा अंत झाला. त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी आणि दोन मुले अशी अपत्ये आहे. सदर घटनेची चौकशी वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री विनायक जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोंगाळे साहेब व बिट जमादार रमेश मेश्राम करीत आहेत.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...