Home / आरोग्य / जिल्ह्यात 24 तासात बरे...

आरोग्य

जिल्ह्यात 24 तासात बरे होणारे दुप्पट

जिल्ह्यात 24 तासात बरे होणारे दुप्पट

जिल्हयात 300 कोरोनामुक्त, 123 पॉझेटिव्ह,  3 मृत्यु

वणी(यवतमाळ):   गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुपटीपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात 123 जण पॉझेटिव्ह तर 300  जण कोरोनामुक्त झाले असून तीन जणांचा मृत्यु झाला. तीनही  मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे. 

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी  एकूण 4354 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 123 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1649 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 694 तर गृह विलगीकरणात 955 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71813 झाली आहे. 24 तासात 300 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 68404 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1760 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 19 हजार 253 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 44 हजार 29 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.60 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 2.82 आहे  तर मृत्युदर 2.45 आहे. आज  खाजगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये पांढरकवडा  तालुक्यातील 53 वर्षीय पुरूष , वणी तालुक्यातील  65 व 60  वर्षीय महिलेचा  समावेश आहे.  

       पॉझेटिव्ह आलेल्या 123 जणांमध्ये 90 पुरुष आणि 33 महिला आहेत. यात आर्णी येथील 3, बाभुळगाव येथील 28, दारव्हा येथील 18, दिग्रस येथील 20, घाटंजी 2, कळंब 2,   महागाव येथील 1, मारेगाव येथील 1, नेर येथील 2, पांढरकवडा 2, पुसद येथील 16, राळेगाव 4,  उमरखेड 1, वणी येथील 4, यवतमाळ 17 तर झरीजामणी येथील 2 रुग्ण आहे. जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1878 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2278 आहे. यापैकी 401 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1878 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 112 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 465 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 110 रुग्णांसाठी उपयोगात, 416 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 179 उपयोगात तर 997 बेड शिल्लक आहेत.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

आरोग्यतील बातम्या

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

शुक्रवारी जिल्ह्यात 116 कोरोनामुक्त तर 63 नवे बाधित

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...