शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
खतांची भाववाढ करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नका...! भाववाढ रद्द करा - संभाजी ब्रिगेडची मागणी
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवू शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात covid-19 मुळे गेल्या वर्ष-दीड वर्षात शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला हा लाॕकडाऊन काळाच्या महामारीच्या सदृश्य परिस्थितीत उध्वस्त झाला. कवडीमोल विकला गेला. अतिवृष्टी, चक्रीवादळ यांनी शेतकरी पूर्ण रसातळाला गेलेला आहे. अशा परिस्थितीत खताच्या किंमती वाढून केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना जर देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर हे निषेधार्ह आहे. मा. नरेंद्र मोदी आणि टीम'नीं शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. मग शेतकऱ्यांचा वाली कोण...?संभाजी ब्रिगेडचा नारा काय तर शेतकऱ्याच्या हक्का साठी संभाजी ब्रिगेड मैदानात , दारूमुक्त गाव हा नारा घेऊन आम्ही सरकारला विचारत आहोत. आधी हजार-आकराशे रुपये पर्यंत मिळणारे रासायनिक किंवा मिश्र खाताचे पोते आज 1925 रुपयाला मिळतात. म्हणजे खताच्या पोत्यामागे सात-आठशे रुपयांनी भाव वाढ होत असेल तर शेतकरी जगणार कसा...? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून महाराष्ट्रात खताच्या किंमती तात्काळ कमी करा... अशी मागणी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
राज्यात प्रचंड महागाई वाढली आहे. फक्त आम्ही गप्पा होत. पेट्रोल-डिझेल शंभर रुपये लिटर पर्यंत गेले. डाळी, खाद्यतेल हे 70-80 रुपये प्रति किलो, लिटर ने भाव वाढ झालेली असताना अजून किती जनतेला हे केंद्र, राज्य सरकार छळणार आहे. आज खते महागली उद्या बी-बियाणे महागा होणार...! म्हणजे शेतकरी जगू शकणार नाही. 'जर शेतकऱ्यांनी नाही केला पेरा..., तर मग काय खाणार धतूरा...! इतकी भयानक अवस्था आज महाराष्ट्रासह देशाची झालेली आहे. ही 'अलिबाबा आणि चाळीस चोरांची फौज शेतकऱ्यांना उध्वस्त करणार आणि आम्ही शांत बसणार हे होणार नाही. खतांच्या किंमती तात्काळ कमी केल्या नाही तर आम्हाला हातात रुमणे घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल असा आवाज संतोष शिंदे यांनी दिला आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...