Home / चंद्रपूर - जिल्हा / विभागीय आयुक्तांनी...

चंद्रपूर - जिल्हा

विभागीय आयुक्तांनी केली आरोग्य व्यवस्थेची पाहणी

विभागीय आयुक्तांनी केली आरोग्य व्यवस्थेची पाहणी

वन अकादमी कोव्हीड सेंटर, नवीन वैद्यकीय महाविद्यालय, ऑक्सीजन प्लाँट, जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट: वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान संभाव्य तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची तयारी जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी शहरातील वन अकादमी येथील कोव्हीड केअर सेंटर, निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील लिक्विड ऑक्सीजन प्लाँट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू युनीट आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली.

वन अकादमी येथील व्हेंटीलेटर कक्षाची पाहणी करतांना मनुष्यबळाची उपलब्धता, व्हेंटीलेटर हाताळण्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ, तसेच ऑक्सीजन पुरवठाचा येथे काय स्त्रोत होता, बाहेरच्या राज्यातून लिक्विड ऑक्सीजन आणण्याची गरज निर्माण झाली होती काय, दुस-या लाटेत सर्वाधित रुग्णसंख्या कितीपर्यंत पोहचली होती, याबाबत त्यांनी विचारणा केली. बांधकाम सुरू असलेल्या नवीन वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील लिक्विड ऑक्सीजन प्लाँट कधीपर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असे विचारले असता, सदर प्लाँट सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरू होणार असल्याचे संबंधित कंत्राटदाराने सांगितले. तिस-या लाटेत ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

यानंतर विभागीय आयुक्तांनी स्त्री रुग्णालयाची तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सीजन प्लाँटची पाहणी केली. येथे उभारण्यात आलेल्या लिक्विड ऑक्सीजन सिलिंडरची क्षमता किती, सदर टँक किती लिटर भरायचा, याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशा सुचना दिल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात पीएम केअर आणि सीएसआर अंतर्गत उपलब्ध झालेल्या व्हेंटीलेटरबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी विभागीय आयुक्तांना माहिती दिली.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...