Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी ग्रामीण रुग्णालयात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या शिवसेनेच्या तेरवा पंधरवाडा ला जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट..!

वणी ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या शिवसेनेच्या तेरवा पंधरवाडा ला जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट..!

शिवसेना पदाधिका-यांच्या बैठकित रुग्णालयातील समस्या सोडविण्याचे आस्वासन.

वणी (प्रतिनिधी): वणी ग्रामीण रुग्णालयातील  अनागोंदी कारभारा विरुद्ध शिवसेना शहर प्रमुख राजू तुरणकर यांनी  सुरू केलेल्या शिवसेनेच्या पंधरवड्यात आंदोलनाला दि.३० सप्टेंबर ला यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक वारे यांनी भेट देऊन समस्या ऐकून घेतल्या. यावेळी रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर मध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वारे, संजय देरकर, सुनील कातकडे, अजिंक्य शेंडे, बंटी ठाकूर व संपूर्ण मेडिकल अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष पुढील उपाययोजने बाबत चर्चा करण्यात आली. रुग्णालयात चोवीस तास एक वैद्यकीय अधिकारी हजर राहणे, बंद असलेले सिझेरियन (प्रसूती)  त्याकरिता आज भुलतज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली, रुग्णालयात पूर्णवेळ करिता स्त्री रोगतज्ञ अधिकारी उपलब्ध करण्याचा पाठपुरावा, रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्याच्या वेळा निच्चीत करून दर्शनस्थळी फलक लावण्यात येणार आहे. अत्यावश्यक काळातील वैद्यकीय अधिकारी वगळता इतर वैद्यकीय अधिकारी दोन्ही वेळ दवाखान्यात उपलब्ध राहतील, यानंतर डॉ घरी आणी परिचारिकांनी फोनवर विचारून  रुग्णांचे उपचार करणार नाही, अती गंभीर रुग्ण वगळता सर्रास रुग्ण रेफर करण्यात येणार नाही.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रांजली विनोद बदखल चा प्रसूतीदरम्यान बालकाचा जीवितास झालेली  गंभीर हानी या बाबत चौकशी समिती बसवून दोषींवर कारवाई करण्याचे ठरले. प्रसूतीसाठी लागणाऱ्या औषधी साठा रुग्णास विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. आवश्यक असलेल्या लसी, औषध साठा उपलब्ध ठेवल्या जाईल, अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांचे हाल, रूग्णांना सतत रेफर करण्यात येत असल्यामुळे जाणारे प्राण याकडे लक्ष देऊन गोरगरीब जनतेला सेवा दिली जाईल, शासन निर्णयानुसार वणी करिता मंजूर झालेले १०० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करणे करिता त्वरित कारवाई करून बांधकाम सुरू करणे करिता पाठपुरावा केला जाईल अश्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन सुव्यवस्था निर्माण करण्याची हमी दिली. यावेळी संतोष कुचनकार, मनीष बतरा,पियुष चव्हाण, सतीश कोंडे, किशोर थेरे ,राहुल झट्टे 
निखिल तुराणकर,जनार्धन थेटे, मंगल भोंगळे,हेमंत गौरकर ईत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...