Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्ह्यातील आदिम कोलामांच्या...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्ह्यातील आदिम कोलामांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे जिल्हाधिका-यांचे आश्वासन..!

जिल्ह्यातील आदिम कोलामांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे जिल्हाधिका-यांचे आश्वासन..!

कोलामांच्या आंदोलनाला मोठे यश : अँड. वामनराव चटप व विकास कुंभारे यांचा पाठपुरावा

जिवती (ता. प्र.) : स्वातंत्र्यदिनी घोडणकप्पी या आदिम वस्तीला रस्त्याने जोडण्याचे अभिनव आंदोलन केल्यानंतर कोलामांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज (ता.२४) जिल्हाधिका-यांनी विस कलमी सभाग्रुहात अधिकारी व कोलाम विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविली व जिल्ह्यातील कोलामांच्या सर्व वस्त्या रस्त्याने जोडून, पिण्याचे पाणि व अन्य समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आश्वासन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिले.

कोलाम विकास फाऊंडेशन या संस्थेने जिवती तालुक्यातील घोडणकप्पी या आदिम वस्तीवर स्वातंत्र्यदिनी रस्ता निर्माणीचे अभिनव आंदोलन केले होते. या आंदोलनात अनेक स्वयंसेवी संस्था व हजारो कोलाम बांधव सहभागी झालेे. यामुळे जिल्ह्यातील कोलाम वस्तींची दुरावस्था उघडकीस आली. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने संबंधीत विभागाचे अधिकारी व कोलाम विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून कोलामांचे वैयक्तिक व वस्त्यांवरील समस्यांची सविस्तर चर्चा घडवून आणली. यात माणिकगड पहाडावरील मुळ रहीवासी असलेल्या कोलामांना वनजमीनीचे पट्टे देतांना पुराव्याची अट शिथील करण्यात आली. याशिवाय, कोलामांना घरकुल योजनेचा लाभ, विविध विषयांचे प्रशिक्षण, सामाजिक सभाग्रुह, वाचनालय, खावटीचे वाटप यासह रस्ते व पाणि आदि सोयी सुविधा तातडीने बहाल करण्याचे निदेश संबंधीत विभागांच्या अधिका-यांना दिले.
या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी घुगे साहेब यांचेसह बांधकाम, वन, पाणि पुरवठा व अन्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. माजी आमदार अँड. वामनराव चटप, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, नानाजी मडावी, मारोती सिडाम हे पदाधिकारी उपस्थित होते.

आदिमच्या योजनेत गैरव्यवहार करणा-यांना कठोर शासन होणार

अनेक कोलामगुड्यांवर कोलामांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन घरकुल व विहीर बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केलेला आढळून येतो. यातील अनेक प्रकरणांची तपासणी करून कोलामांसाठी असलेल्या योजनांचा निधी हडपल्याचे तथ्ये उघडकीस आले आहे. अजुनही अनेक घरकुलांची व विहीर बांधकामाची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिका-यांनी दिले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...