शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
पहिल्या दिवशी 18 ते 44 वयोगटातील 1193 नागरिकांना दिली लस, कुंभमेळाव्यातून येणाऱ्या भाविकांना विलगीकरणात ठेवावे
चंद्रपूर दि. 3: लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यातून कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांनी तसेच 45 वर्षावरील जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून दिलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आज कोरोना टास्क समितीची बैठक झाली यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहण घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
45 वर्षावरील नागरिकांचे लसिकरण करतांना प्रत्येक केंद्रावर 60 टक्के ऑनलाईन नोंदणीद्वारे तर 40 टक्के थेट या समीकरणाद्वारे लसीकरण करावे. या 40 टक्के लाभार्थ्यांनाही टोकण देवून टाईम स्लॉट प्रमाणे सर्वांचे लसीकरण करावे व लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याबाबत केंद्रप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात 2 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून पहिल्या दिवशी 1193 नागरिकांना लस चा पहिला डोज दिला असल्याचे तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 44 हजार 981 डोज दिले असल्याची माहिती लसीकरण अधिकारी संदिप गेडाम यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांनी औषध साठा, रेमेडिसीवर इंन्जेक्शनचे वाटप, ऑक्सीजन साठा याबाबत माहिती घेतली तसेच कुंभमेळाव्यातून येणाऱ्या भाविकांवर पोलीस विभागाने लक्ष ठेवून त्यांना विलगीकरणात पाठविण्याच्या सूचना दिल्या. मनपा व जिल्हा आरोग्य विभागाने ॲन्टीजेन कोरोना टेस्ट किट पर्याप्त मात्रेत साठा करून ठेवाव्या. तसेच जिल्हा स्त्री रूग्णालयात ऑक्सीजन बेडसाठी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तेथील सी-विंग तातडीने रिक्त करून घेण्याच्या सूचना अधिष्ठाता यांना दिल्या.
बैठकीला डॉ. प्रकाश साठे, डॉ. अविष्कार खंडारे, डॉ.सुधीर मेश्राम, डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. प्रतिक बोरकर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...