Home / चंद्रपूर - जिल्हा / हत्तीरोग दूरीकरणाकरीता...

चंद्रपूर - जिल्हा

हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज..

हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज..

1 जुलैपासून आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहिम

चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी ) : राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 1 ते 15 जुलै 2021 या कालावधीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीरोग दूरीकरणाकरीता सार्वत्रिक औषधोपचार विशेष मोहिम संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे.

हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या मादीपासून संक्रमीत होणारा दुर्लक्षित आजार आहे. या  आजारामुळे रुग्ण दगावत नसला तरी, हत्तीसारखे हात, पाय सुजणे, स्तनांवर सुज येणे, अंडवृध्दी होणे अशा प्रकारच्या शारिरीक विकृती येऊ शकतात. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा आजार असून  रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परीणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक औषधांचे वर्षातून किमान एकदा सेवन करणे आवश्यक आहे.

सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेंतर्गत दोन वर्षाखालील बालके, गर्भवती माता, एक आठवड्यापर्यंतच्या स्तनदा माता व अतीगंभीर आजारी व्यक्ती यांना वगळून संपूर्ण समुदायाला जेवणानंतर वयोमानानुसार तसेच उंचीनुसार अलबेंडाझोल व आयव्हरमेक्टीन, डी.ई.सी. या औषधांची मात्रा प्रत्यक्ष खाऊ घालण्यात येणार आहेत. याकरीता संपूर्ण जिल्हयात 3945 एवढे मनुष्यबळ घरोघरी जाऊन, व्यापारी संस्थाने, शासकीय-निमशासकीय कार्यालये, कारखाने ई. ठिकाणी भोजन अवकाशात, वयोगटानुसार प्रत्यक्ष गोळया खाऊ घालणार असून पर्यवेक्षणाची जबाबदारी 904 मनुष्यबळावर सोपविण्यात आली आहे. 

तसेच हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेस सर्व मान्यवर पदाधिकारी, शासकीय-निमशासकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय व्यावसायिक, महिला मंडळ, बचत गट, सेवाभावी संस्था, शिक्षण संस्था यांनी हत्तीरोगाचे समुळ उच्चाटनाकरीता सामाजिक बांधीलकी जपत सहकार्य करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांसमक्ष दिलेल्या हत्तीरोग विरोधी औषधाचे सेवन करून हत्तीरोगाच्या निर्मुलनास हातभार लावावा. असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी कळविले आहे.

प्रशासनाचे आवाहन : जिल्हयातील हत्तीरोगाचे सद्यस्थितीचे अवलोकन करता दि. 1 ते 15 जुलै 2021 या कालावधीत होऊ घातलेल्या हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत जनतेने सहभाग दर्शवावा तसेच जिल्हयातील शासकीय-निमशासकीय संस्थांनी हत्तीरोगाचे समुळ उच्चाटनाकरीता सामाजिक बांधीलकी जपत सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच  मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल कार्डीले यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...