Home / चंद्रपूर - जिल्हा / शेतकरी संघटना व दिवे...

चंद्रपूर - जिल्हा

शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कोलामगुड्यावर धान्य कीटचे वाटप

शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कोलामगुड्यावर धान्य कीटचे वाटप

स्व. कु. स्नेहल प्रभाकरराव दिवे यांचा पाचवा स्म्रुतीदिन

जिवती दि. 5:  गरजूंना आवश्यक समयी मदतीचा हात देवून त्यांना आधार देण्याची परंपरा दिवे परिवारानी सदोदीत जपली आहे. स्वर्गिय कु. स्नेहल प्रभाकरराव दिवे हिच्या मनातील समाजसेवेच्या उदात्त भावनेची परंपरा तिच्या मरणोपरांत तशीच तेवत राहावी व गरीब- गरजूंच्या सेवेचे व्रत समाजातील अनेकांना प्रेरणादायी ठरावे यासाठी कु. स्नेहलच्या पाचव्या स्म्रुती दिनाप्रित्यर्थ दिवे परिवार व शेतकरी संघटनेच्या वतीने जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कठीण प्रसंगी एकमेकांचे सहकार्य करण्याची भावना समाजातील प्रत्येकाने अंगिकारावी अशी भावना माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते अँड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या वतीने अतिदुर्गम अशा बागुलवाई कोलामगुड्यावरील बत्तीस कुटूंबांना आज (ता.५) तूर दाळ, साखर, तेल, तिखट, मीठ, आलू, कांदे, साबण, बिस्कीट अशा जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजुरा बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकरराव ढवस, नगरसेवक भाऊजी कन्नाके व मधूकर चिंचोलकर, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख कपिल इद्दे, तालुका उपाध्यक्ष दिलीप देठे, मनोज मून, भीमराव बंडी, ऋषी बोरकुटे, मधूभाऊ जिवतोडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आदिम कोलाम बांधवांना मदतीचा हात देऊन सहकार्य केल्याबद्दल बागूलवाईचे गावपाटील भोजू जंगू आत्राम व अन्य कोलाम माता भगिनी व बांधवांनी समाधान व्यक्त केले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...