Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / गुन्हे शोध पथक बरखास्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

गुन्हे शोध पथक बरखास्त करून त्या अंमलदारांना मुख्यालयी सलग्न करा 

गुन्हे शोध पथक बरखास्त करून त्या अंमलदारांना मुख्यालयी सलग्न करा 

राजुरा विधानसभा युवक काँग्रेसची मागणी; गुन्हेगारी, चोरीला शहरात सुगीचे दिवस

राजुरा : तालुक्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून किरकोळ गुन्ह्यासह मोठ्या गुन्ह्यांत ही लक्षणीय वाढ होत आहे. चोरी, छेडछाड, मारपीठ, धमकी यांसारखे प्रमाण अधिक आहे. राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे शोध पथकात (डी.बी.) कार्यरत काही अंमलदारांकडून गुन्हेगार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींशी संबंध ठेवून अनेक गुन्हे अफरातफर केले जात आहे. या पथकातील अंमलदारांबदल विविध संघटना व पक्षांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या आहे.

मात्र यावर कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने राजुरा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांना निवेदनातून राजुरा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक (डी .बी.) बरखास्त करून मुख्यालयी संलग्न करण्याची मागणी केली आहे.

काही अंमलदारांकडून वाहन चोरी प्रकरणात बनावट मौका पंचनामा केल्याचे वृत्तपत्रात वृत्त छापून आले होते. याबाबत विभागाकडून थातूरमातूर चौकशी करून संबंधीत अंमलदारांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सद्या राजुरा शहरात गुन्हे शोध पथक (डी.बी.) च्या संगनमताने अनेक गैरधंदे जोमात सुरू आहे. वेकोली परिसरात चोरट्यांना (डी बी) गुन्हे शोध पथकाकडून खुली सूट दिल्या गेल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात असून, बल्लारपूर परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना राजूरा परिसरात आमंत्रित केले जात असून दिवसा गणिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

काही अमलदारांनी तर चोरट्यांशी हात मिळवणी करून अर्थपूर्ण व्यवहार करीत आहे. या सर्वांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असून राजुरा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक (डी.बी.) बरखास्त करून तेथील अंमलदारांना मुख्यालयी सलग्न करण्यात यावे, अन्यथा युवक काँग्रेस कडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. परिस्थिती चिघळल्यास यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष एजाज अहमद यांनी निवेदनातून सांगितले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...