वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता, चंद्रपूर: (Chandrapur Dinosaur Fossil) चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात ४ फुट लांब आणि १ फुट रुंद पायाचे हाड,३ फुट लांब बरगडी चे हाड आढळले आहे. त्यांचा आकार पाहता ते डायनोसोर ह्या विशालकाय प्राण्याचे १५-२० हजार वर्षापूर्वीचे असल्याचा अंदाज चंद्रपूर येथील भुशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केला व्यक्त केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या (Chandrapur Dinosaur Fossil) पश्चिमेला तुळाना गावाजवळून वर्धा नदी वाहते. नदीच्या पात्रात काही ठिकाणी मागील हिमयुगीण काळात महापुरात वाहत आलेला दगड-गाळाचा थर आहे. तर त्याच ठिकाणी ६ कोटी वर्षाच्या काळातील बेसाल्ट खडकाचे थर आहेत. दोन्ही थरांची सळमिसळ झाल्याने काळाचा अंदाच घेणे कठीण होते. स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे आणि त्यांची शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडक आढळली होती,परंतु ही हाडे किंवा दगड आहे किंवा काय हे त्यांना कळले नसल्याने त्यांनी चंद्रपूर तेथील भुशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांचेशी संपर्क करून येथे संशोधन करण्याची गरज व्यक्त केली.२९ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी जीवाश्म स्थळी भेट देवून निरीक्षणे केले. ती हाडे हे जीवाश्म असून डायनोसोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी असा अंदाज व्यक्त केला.
ह्यातील मोठे जीवाश्म हे ४ फुट लांब मांडीचे हाड आहे,आणि जवळच छातीच्या बरगडीचे ३ फुट लांब हाड आढळले .हाडाच्या आकारावरून हा प्राणी १५ फुट उंच आणि आणि २० फुट लांब असावा.ह्यावरून हा जीव एकतर डायनोसोर किंवा विशाल आकाराचा हत्ती असला पाहिजे. इथे गेल्या काही वर्षापासून रेती उत्खननाचे कांम सुरु असल्याने काही हाडे पाण्यात फेकली असल्याचे गावकऱ्याचे मत आहे. काही जीवाश्मे फेकन्यात गेली असावी असे चोपणे ह्याना वाटते. हे जीवाश्म अगदी नाजूक आणि कच्चे असल्यामुळे ते काही १५-२० हजार वर्षादरम्यानाचे असावे असा अंदाज व्यक्त केला. आकारावरून ते विशालकाय डायनोसोर चे असल्याचे वाटते परंतु ज्या गाळात ते आढळतात आणि जितके ते जीवाश्म नाजूक आहे त्यावरून आणि त्यांना अलीकडे ह्याच नदीत सापडलेले हत्तीच्या दातांचे पुरावे ह्यावरून ते हत्तीचे असावे असा अंदाज प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केला. त्यांनी भूशास्त्र विभागाला ह्याबाबत कळविले असून त्यांच्या सर्वेक्षण आणि प्रयोगशाळेतील तपासणी नंतरच ते जीवाश्म नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे आणि काळ कोणता आहे ते कळणार आहे. (Chandrapur Dinosaur Fossil)
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...