वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : दिनांक २५ जुलै २०२१ रोजी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, शाखा -चंद्रपूर संघटना संवाद सभेचे आयोजन उर्जानगर कॉलनी, धम्म वाचनाल हॉल इथे करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य शाखेचे अध्यक्ष मा. अनिल कुमार ढोले, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाना पांडे, कोर कमिटी सदस्य, मा.श्री विलासराव डाखोडे उपाध्यक्ष, मा. उज्वल रोकडे कोषाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात सभा ठिक १२ वाजता धम्म वाचनालय सभागृह ऊर्जानगर इथे सभेला सुरुवात झाली. सर्वात प्रथम राज्याध्यक्ष अनिल कुमार ढोले यांच्या हस्ते लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर पाहुण्यांना स्थानापन्न करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर संवाद सभेस उपस्थित सदस्यांचा परिचय झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनगर अधिकारी कर्मचारी संघटना शाखा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष माननीय प्रवीण भाऊ बच्चे,राजूरा यांनी प्रास्ताविक. केले यात त्यांनी संघटनेची एक वर्षातील वाटचाल, तीन तालुक्यात कार्यकारिणीची स्थापना, व पुढील संघटनेची रुपरेखा, दिशा स्पष्ट केली. जिल्हा कार्यकारणी बळकट करण्यासाठी कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे बोलून दाखविले. जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा गट करून प्रत्येक गटात एक उपाध्यक्ष ,संघटक, सचिव ठेवून सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व देण्याचे ठरले. त्यानंतर संघटनेचे जिल्हा कार्यकारणी कार्याध्यक्ष मा. संजयराव बोधे,वरोरा यांनी संघटनेचे महत्त्व आपल्या भाषणातून विषद केले. ही अराजकीय संघटना असून सर्वांनी मिळून सहकार्य करून जास्तीत जास्त समाज बांधवांना पर्यंत संघटनेचे कार्य व विस्तार पोचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची त्यांनी विनंती केली. संघटनेत सक्रिय राहून आपल्या समाज बांधवांची कशी मदत करता येईल, पोट जातीत रोटी-बेटी व्यवहार कसे सुरु करता येईल, गरजू व अन्यायग्रस्त बांधवांना त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेचे लेटरपॅड चा वापर कसा करता येईल, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष श्री विलासराव डाखोडे, नागपूर* यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक समाजाचे सभागृह आहेत परंतु ,धनगर समाजाचे एकही सभागृह दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने संघटनेशी जुळून दबावगट तयार करावा व आपल्या समाज बांधवावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध संघटनेचे लेटरपॅडवर करावा अशी त्यांनी विनंती केली. त्यानंतर अध्यक्षीय भाषण करण्याकरिता धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्याध्यक्ष मा. अनिल कुमार जी ढोले यांनी विस्तृत असं कायदेशीर बाबी ला धरून अधिसंख्य पदा बाबतीत मार्गदर्शन केले व या पदाचा जीआर कसा अन्याय पूर्वक आहे, जीआर मागील पार्श्वभूमी काय होती, आणि भविष्यात धनगर समाजाला कोणत्या अडचणी येऊ शकतील, आपले आरक्षण संपवण्यासाठी विरोधक कसे प्रयत्न करत आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी आता संघटित होणे फार गरजेचे आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विस्तृतपणे सांगितले. बहिरा केसमुळे आलेली परिस्थिती याबद्दल त्यांनी विविध उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित सभासदां पैकी श्री.नरेश शेळकी साहेब , सहायक पोलिस निरीक्षक यांनी त्यांना डिपार्टमेंटच्या चुकीने कसे अधिसंख्य ठरवले यांची आपबीती सांगितली.
विचारलेल्या शंकेचे समाधान केले व संघटनेचे सभासद होऊन आपल्यासारख्या अन्यायग्रस्त धनगर अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्नासाठी झटावे ही विनंती केली. श्रीमती मीरा यारेवार,अधिपरिचारिका यांनी अधीसंख्य आदेशा बाबत त्यांनी प्रश्न विचारले असता त्यांचे शंकेचे साहेबांनी समाधान केले. लवकरच अधिसंख्य पदाच्या केसचा निकाल लागेल, तो निकाल लागल्यानंतर आपण पुढील दिशा ठरवू असे त्यांनी सांगितले. संघटनेत पावती फाडून जास्तीत जास्त सभासद व्हा व आपण दिलेल्या रकमेचा पारदर्शक हिशोब सुद्धा ठेवा असे त्यांनी सुचवले.
संवाद सभा कार्यक्रमाचे संचालन श्री हेमंत कुमार ढोले, ऊर्जानगर यांनी केले. या संवाद सभेचे आयोजन चंद्रपूर येथील उर्जानगर मधील अधिकारी कर्मचाऱी यांनी संघटीतपणे यशस्वीरीत्या पार पडले. ऊर्जानगर वसाहतीमधील मा. उत्तमराव रोकडे साहेब, हेमंतकुमार ढोले, शंकरराव दरेकर, विजयराव आस्कर,लक्ष्मण सरवदे,राम बोंबले, सुनिल गवळे,अमोल जानकर, राजेंद्र लांडे, धर्मेंद्र आस्कर, विलास उगे, व त्यांच्या उर्जानगर चमूने विशेष प्रयत्न करून सभा यशस्वी करण्यासाठी योगदान उल्लेखनीय राहिले.
या सभेसाठी श्री राजेश ढाले,औषध नि. अधिकारी, नरेश शेरकी, पोलीस उपनिरीक्षक, विठ्ठल मात्रे, भगवान दंडवते, रामकिसन चिडे, बालाजी नंदगावे, दशरथ धावणे, रुपेश चिडे ,श्रीमती मीरा यारेवार, काशिनाथ बोधे, गणपत येवले, राजेंद्र लांडे ,बंडू बुच्चे, महेश गोरे ,जगदीश चोरमल्ले, एन.डी. खरबे, प्रवीण बुच्चे, विवेक तास्के, संजय बोधे व कैलास उरकुडे यांची उपस्थिती होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...